​खरचं लग्नाआधी प्रेग्नंट होती का रिया सेन? वाचा काय आहे सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:38 IST2017-09-08T07:08:13+5:302017-09-08T12:38:13+5:30

मुनमुन सेनची लहान मुलगी रिया सेन अलीकडे विवाहबंधनात अडकली. शिवम तिवारीसोबत तिने लग्नगाठ बांधली. बंगाली रितीरिवाजानुसार रिया व शिवम ...

Actually before the wedding was Riya Sen? Read what the truth is! | ​खरचं लग्नाआधी प्रेग्नंट होती का रिया सेन? वाचा काय आहे सत्य!

​खरचं लग्नाआधी प्रेग्नंट होती का रिया सेन? वाचा काय आहे सत्य!

नमुन सेनची लहान मुलगी रिया सेन अलीकडे विवाहबंधनात अडकली. शिवम तिवारीसोबत तिने लग्नगाठ बांधली. बंगाली रितीरिवाजानुसार रिया व शिवम यांचे लग्न झाले. पुण्यात अगदी गुपचूपपणे हा विवाह सोहळा झाला. रिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, त्यामुळे तिने कुठलाही गाजावाजा न करता मोजक्याच मित्रपरिवारांसमवेत बॉयफ्रेंड शिवम तिवारीबरोबर लग्न उरकले,अशी चर्चा या विवाहसोहळ्यानंतर दबक्या आवाजात सुरु झाली. आता या बातमीत किती सत्यता आहे, हे आम्हाला ठाऊक असण्याचे तसेही कारण नाही. पण आता खुद्द रिया सेन यावर बोलली आहे. 
होय, रियाने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या रहस्यावरचा पडदा उठवला आहे. लग्नाआधीच मी प्रेग्नंट होते, अशा अफवा उडतील, हे मला अपेक्षितच होते. त्यामुळे अशी चर्चा झाली तेव्हा मला काहीही आश्चर्य वाटले नाही. बातमी खोटी म्हटल्यावर त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रश्नच नव्हताच, असे ती म्हणाली.



ALSO READ : WHAT? ​रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नंट?

केवळ लग्नाआधी प्रेग्नंट होण्याबद्दलच्या अफवेबद्दलच नाही तर शिवमसोबतची लव्हस्टोरी, लग्नानंतरचा हनीमून प्लान यावरही ती बोलली. तिने सांगितले की,१२ फेबु्रवारीला जुहूतील हॅरी बारमध्ये आम्ही भेटलो. त्यादिवशी मध्यरात्रीपर्यंत आम्ही सोबत होतो. आमच्या काही कॉमन मित्रांनी ही डेट घडवून आणली होती. शिवमने मला अनपेक्षितपणे प्रपोज केले होते. एका सकाळी तो रोजच्या सारखा उठला अन् आत्ताच आपण लग्न करूयात, म्हणून माझ्या मागे लागला. लग्नानंतर खरे तर रिया व शिवम दोघेही सध्या हनीमूनवर असायला हवे होते. पण तूर्तास तरी हा हनीमून प्लान काहीसा लांबला आहे.  सध्या मी कामात व्यस्त आहे. एकदा का वेळ मिळाला की, आम्ही धावत सुटू,असे ती म्हणाली.

Web Title: Actually before the wedding was Riya Sen? Read what the truth is!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.