​शोले या चित्रपटात गब्बरच्या भूमिकेसाठी या अभिनेत्याचा करण्यात आला होता विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 13:41 IST2018-06-06T08:11:57+5:302018-06-06T13:41:57+5:30

‘शोले’ या अजरामर चित्रपटातील गब्बर आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. गब्बर सिंगच्या तोंडचे संवाद तुफान गाजले होते. अभिनेते अमजद ...

The actress was thought to have played the role of Gabbar in Sholay | ​शोले या चित्रपटात गब्बरच्या भूमिकेसाठी या अभिनेत्याचा करण्यात आला होता विचार

​शोले या चित्रपटात गब्बरच्या भूमिकेसाठी या अभिनेत्याचा करण्यात आला होता विचार

ोले’ या अजरामर चित्रपटातील गब्बर आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. गब्बर सिंगच्या तोंडचे संवाद तुफान गाजले होते. अभिनेते अमजद खान यांनी ही भूमिका अजरामर केली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी अमजद खान हे शोले चित्रपटाच्या टीमची पहिली पसंती नव्हते.
शोले या चित्रपटाची पटकथा सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेली होती तर या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले आहे. या चित्रपटासाठी दमदार आवाज असलेला अभिनेता योग्य असल्याचे जावेद अख्तर यांचे मत होते. अमजद खान यांचा आवाज या व्यक्तिरेखेसाठी तितका दमदार नाही असे जावेद अख्तर यांना वाटत होते तर पडद्यावर भयावह दिसेल, अशा अभिनेत्याच्या शोधात रमेश सिप्पी होते. त्यामुळे या भूमिकेसाठी डॅनी डेंझोपाला विचारण्यात आले होते. पण डॅनी यांच्याकडे तारखा नसल्याने त्यांनी नकार दिला. खरे तर संजीव कुमारही गब्बरच्या भूमिकेत इंटरेस्टेड होते. पण संजीव कुमारला या भूमिकेसाठी घेतले असते तर ठाकूर साहबची भूमिका कुणी केली असती? अशातच एकेदिवशी मेहमूद यांनी सिप्पींची अमजद खान यांच्याशी ओळख करून दिली. पण अमजद खान सिप्पी यांना कुठल्याही अँगलने गब्बरच्या भूमिकेसाठी ‘फिट’ वाटत नव्हते. इंग्रजांसारखा दिसणारा हा सुंदर चेहरा या भूमिकेसाठी योग्य नाही, असे सिप्पींचे मत होते. मग काय? अमजद खान जसे आलेच तसेच सिप्पींच्या कार्यालयातून निघून गेलेत. दुसऱ्या दिवशी सिप्पी आपल्याच कार्यालयात संजीव कुमार आणि मेहमूद यांच्याशी ‘शोले’वर चर्चा करत होते. अचानक एक भयावह दिसणारी व्यक्ती बळजबरीने सिप्पींच्या कार्यालयात शिरली. मळलेले कपडे आणि हातात बंदूक़ घातलेल्या त्या व्यक्तीने रमेश सिप्पींना बंदी बनवले आणि त्यांना धमकावू लागले. सगळेच घाबरले. सिप्पी तर ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून सिक्युरिटी धावून आली आणि त्यांनी त्या व्यक्तीला पकडले. सिप्पींनी लगेच पोलिसांना फोन करण्यासाठी रिसीव्हर उचलला. तितक्यात ती व्यक्ती जोराने ओरडली. सर, मी कुणी दरोडेखोर नाही तर अमजद खान आहे आणि अशाप्रकारे ही भूमिका नंतर अमजद खान यांच्याकडेच आली आणि त्यांनी या भूमिकेचे सोने केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 

danny denzongpa sholay

Also Read : ​'या' ​बॉलिवूड चित्रपटांचा ऐनवेळी बदलला Climax !

Web Title: The actress was thought to have played the role of Gabbar in Sholay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.