चाहत्याने काढली या अभिनेत्रीची छेड; सेल्फी घेण्याच्या बहाण्याने ठेवला कमरेवर हात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 20:57 IST2018-06-13T15:20:45+5:302018-06-13T20:57:23+5:30

‘प्यार का पंचनामा’, ‘आकाशवाणी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री नुसरत भरूचा ...

Actress wandered by fan; Selfie shedding up the hand in the room! | चाहत्याने काढली या अभिनेत्रीची छेड; सेल्फी घेण्याच्या बहाण्याने ठेवला कमरेवर हात !

चाहत्याने काढली या अभिनेत्रीची छेड; सेल्फी घेण्याच्या बहाण्याने ठेवला कमरेवर हात !

्यार का पंचनामा’, ‘आकाशवाणी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री नुसरत भरूचा हिच्याशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे झाले असे की, नुसरत पुणे येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. याच ठिकाणी एका चाहत्यांनी तिचे छेड काढली. 

नुसरत ज्या इव्हेंटमध्ये पोहोचली होती, त्याठिकाणी तिच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. यातीलच एकाने तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिला रिक्वेस्ट केली. जेव्हा नुसरत त्याच्यासोबत फोटो क्लिक करीत होती, तेव्हा तो तिच्या खूपच जवळ आला. तो इथवरच थांबला नाही तर त्याने नुसरतच्या चक्क कमरेवर हात ठेवला. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. चाहत्याच्या या प्रकारामुळे नुसरतला धक्काच बसला. ही बाब जेव्हा तिच्या टीम मेंबरच्या लक्षात आली तेव्हा त्याने लगेचच तिची मदत केली. 

टीम मेंबर्सनी केवळ त्या चाहत्याला फटकारलेच नाही तर, त्याला नुसरतपासून दूर राहण्याचा रितसर सल्लाही दिला. छेडछाडीनंतर नुसरतने सांगितले की, मी माझ्या सुरक्षेची जबाबदारी इव्हेंट आयोजकांवर सोपवित असते. बºयाचदा लोक माझ्याकडे सेल्फी क्लिक करण्यासाठी रिक्वेस्ट करीत असतात; परंतु यावेळेस जे घडले ते खरोखरच धक्कादायक होते. 

एक मुलगा माझ्याकडे फोटो क्लिक करण्यासाठी आला होता. मला याबाबतची अजिबातच जाणीव नव्हती की, त्याचा यामागचा नेमका हेतू काय होता. मी त्याला काही अंतरापर्यंत जवळ येऊ दिले; परंतु तो इतक्या जवळ आला की, त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला. त्याचे हे कृत्य बघून मला धक्काच बसला; परंतु काही रिअ‍ॅक्ट झाले नाही. सुदैवाने माझा मेकअप आर्टिस्ट माझ्यासोबत होता. त्याच्या मदतीने मी त्याला बाजूला सारले. मी कधीच माझ्या फ्रेंडली स्वभावामुळे लोकांचे नेचर समजू शकत नाही. 

Web Title: Actress wandered by fan; Selfie shedding up the hand in the room!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.