Kirron Kher : धक्कादायक! अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; मुंबईत उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 11:27 AM2021-04-01T11:27:55+5:302021-04-01T11:36:44+5:30

Kirron Kher suffering from blood cancer : किरण खेर यांचे मित्र आणि भाजप चंदीगडचे मेंबर अरूण सूद यांनी बुधवारी एक खास पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

actress turned politician Kirron Kher is suffering from blood cancer Chandigarh's BJP president revealed | Kirron Kher : धक्कादायक! अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; मुंबईत उपचार सुरु

Kirron Kher : धक्कादायक! अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; मुंबईत उपचार सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देकिरण खेर यांनी 1985 साली अभिनेते अनुपम खेर (anupam kher) यांच्यासोबत लग्न केले.

बॉलिवूड अभिनेत्री तसेच भाजपा खासदार किरण खेर (Kirron Kher) यांना ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. किरण यांना मल्टीपल मायलोमा असल्याचे निदान झाले आहे. हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. तूर्तास 68 वर्षीय किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असल्याचे कळतेय. (Kirron Kher suffering from blood cancer)
अद्याप किरण खेर वा त्यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तथापि किरण खेर यांचे सहकारी व भाजपा चंदीगडचे सदस्य अरूण सूद यांनी बुधवारी एका विशेष पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले, ‘गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाला. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर (Blood Cancer) आहे. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होते. त्यामुळे गेल्या 4 डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. अलीकडे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांवरून कॅन्सरचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 4 महिन्यांत त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. आता त्यांना रूग्णालयात भरती होण्याची गरज नाहीये. फक्त चाचण्या व उपचारासाठी नियमितपणे रूग्णालयात जावे लागणार आहे.’

किरण खेर या 2014 साली पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकत खासदारकी मिळवली. अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेल्या किरण यांनी 1990 साली सरदारी बेगम या श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.  बैरीवाली या बंगाली चित्रपटासाठीत्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.

किरण खेर यांनी 1985 साली अभिनेते अनुपम खेर (anupam kher) यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती. ते दोघे एकाच थिएटरमध्ये काम करत होते. कामादरम्यान ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Web Title: actress turned politician Kirron Kher is suffering from blood cancer Chandigarh's BJP president revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.