स्वरा भास्करला कन्हैय्या कुमारचा प्रचार करणे पडले महाग, वाचा कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 02:45 PM2019-10-13T14:45:00+5:302019-10-13T14:45:01+5:30

यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वरा एका उमेदवाराचा प्रचार करताना दिसली होती.

actress swara bhaskar had to pay off for supporting kanhaiya kumar | स्वरा भास्करला कन्हैय्या कुमारचा प्रचार करणे पडले महाग, वाचा कसे?

स्वरा भास्करला कन्हैय्या कुमारचा प्रचार करणे पडले महाग, वाचा कसे?

googlenewsNext
ठळक मुद्देस्वराच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्याय, ‘शीर कोरमा’ ही एका लेस्बियन कपलची कथा आहे.

चित्रपटांपासून राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर परखड मत मांडणा-या स्वरा भास्करसाठी ट्रोलिंग नवे नाही. स्वरा रोज बोलते आणि रोज ट्रोल होते. पण स्वरा या ट्रोलिंगची पर्वा करत नाही.  यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वरा एका उमेदवाराचा प्रचार करताना दिसली होती. बिहारमधील बेगूसुराई लोकसभा मतदार संघात कन्हैय्या कुमारचा तिने हिरहिरीने प्रचार केला होता. पण आता निवडणुकीनंतर इतक्या महिन्यांनी स्वराने एक मोठा खुलासा केला आहे. होय, निवडणुकीचा प्रचार केल्यामुळे तिला हातचे चार मोठे ब्रँड गमवावे लागलेत.


‘शीर कोरमा’ या आगामी सिनेमाच्या पोस्टर लॉन्चवेळी खुद्द स्वराने हा खुलासा केला. स्वत:चे सोशल लाईफ आणि राजकीय विचार यावर बोलताना स्वराने हा खुलासा केला. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मी काही उमेदवारांचा प्रचार करायला गेले, त्याच दिवशी मी चार ब्रँड गमावले. तीन इव्हेंटमधून मला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. सार्वजनिक आयुष्य जगतांना अनेकदा मोठी किंमत चुकवावी लागते, असे ती म्हणाली.


देशाच्या सद्यस्थितीवरही ती बोलली. सध्या सामाजिक व राजकीय विषयांवर बॉलिवूडला अधिक संवेदनशील होण्याची गरज व्यक्त करताना ती म्हणाली की, एखादा दलित तो भयभीत असल्याचे म्हणत असेल तर त्याकडे लक्ष दिले जायला हवे.


स्वराच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्याय, ‘शीर कोरमा’ ही एका लेस्बियन कपलची कथा आहे. यात स्वरासोबत दिव्या दत्ता लेस्बियन कपलची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Web Title: actress swara bhaskar had to pay off for supporting kanhaiya kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.