...या अभिनेत्री स्लीम फिगरसाठी ट्रेनरला मोजतात ‘इतके’ रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 19:50 IST2017-07-13T14:20:16+5:302017-07-13T19:50:16+5:30

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटात कॅट खूपच सुंदर आणि फिट दिसत ...

... this actress slam the trainer for slim figure 'so many' rupees! | ...या अभिनेत्री स्लीम फिगरसाठी ट्रेनरला मोजतात ‘इतके’ रुपये!

...या अभिनेत्री स्लीम फिगरसाठी ट्रेनरला मोजतात ‘इतके’ रुपये!

िनेत्री कॅटरिना कैफ हिचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटात कॅट खूपच सुंदर आणि फिट दिसत आहे. १४ वर्षांपूर्वी तिच्या डेब्यू ‘बूम’ (२००३) या चित्रपटात दिसत होती, अगदी तशीच ती याही चित्रपटात फिट दिसत आहे. अर्थात फिट राहण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असून, यासाठी ती ट्रेनर यास्मीन कराचीवाला हिची मदत घेत असते. अर्थात याकरिता तिला हजारो रुपयेही मोजावे लागतात. होय, कॅट तिच्या ट्रेनरला महिन्याकाठी ४५ हजार रुपये देत असते. हा आकडा थक्क करणारा असला तरी, कॅटप्रमाणे बॉलिवूडमधील आणखीही काही अभिनेत्री आहेत, ज्या ट्रेनरला अशाच प्रकारे भारीभक्कम रक्कम देत असतात. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...



मलाइका अरोरा
ट्रेनर : अंशुका पारवानी
मासिक शुल्क : ७३००० रुपये
४३ वर्ष इतके वय असतानाही अभिनेत्री मलाइका अरोरा जबरदस्त फिट आहे. मलाइका तिच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत असून, ती नेहमीच जीम तथा योगा क्लासला जाताना दिसत असते. शिवाय तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही आपल्या फिटनेसचा जलवा दाखविणारे फोटोज् अपलोड करीत असते. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, मलाइका फिटनेसकरिता किती खर्च करीत असेल? असो, मलाइकाला इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर अंशुका ट्रेनिंग देते. मलाइका अंशुकाला महिन्याकाठी ७३ हजार रुपये फिस देते. अंशुकाच्या केवळ १२ क्लासेसची फिस ३६ हजार रुपये इतकी आहे. 



दीपिका पादुकोण
ट्रेनर : यास्मीन कराचीवाला
मालिक शुल्क : ४५००० रुपये

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणदेखील कॅटरिना कैफची फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला हिच्याकडूनच वर्कआउट ट्रेनिंग घेत असते. खरं तर दीपिका आणि कॅटमध्ये नेहमीच कोल्ड वॉर असल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशात या दोघींना ट्रेन करताना यास्मीनची कसोटी लागते. या दोघी समोरासमोर येऊ नयेत म्हणून यास्मीनने दोघींचीही वेळ वेगवेगळी ठेवली आहे. यास्मीनला कॅट जेवढे पैसे मोजते तेवढेच पैसे (४५ हजार रुपये) दीपिकाही देत असते. 



करिना कपूर-खान
ट्रेनर : नम्रता पुरोहित
मासिक शुल्क : ६५००० रुपये
तैमूरच्या जन्मानंतर करिना कपूर-खानचे वजन प्रचंड वाढले होते. परंतु जीम आणि योगाचा आधार घेत करिनाने आपले वाढलेले वजन कमी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून करिना पहिल्यासारखा फिगर मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचे दिसून आले. करिनाला नम्रता पुरोहित ट्रेनिंग देत असून, यासाठी ती नम्रताला महिन्याला ६५ हजार रुपये फिस देत असते. नम्रताच्या १२ क्लासेसची फिस ३२ हजार रुपये आहे. 



सोनम कपूर
ट्रेनर : राधिका करले
मासिक शुल्क : ५५००० रुपये 

आपल्या फॅशन सेन्समुळे सदैव चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फिटनेसप्रती प्रचंड जागरूक आहे. खरं तर लहानपणी सोनम खूपच वजनदार होती. मात्र बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिने वजन कमी करीत स्लीम फिगर मिळवला. यासाठी तिला ट्रेनर राधिका करले हिने मदत केली. सोनमला आजही राधिकाच ट्रेनिंग देत असून, त्यासाठी सोनम तिला महिन्याकाठी ५५ हजार रुपये फिस देते. 



आलिया भट्ट
ट्रेनर : यास्मीन कराचीवाला
मासिक शुल्क : ४५००० रुपये

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हीदेखील तिच्या फिटनेसप्रती खूपच जागरूक आहे. वास्तविक आलियाचा भाऊ राहुल फिटनेस ट्रेनर आहे. मात्र अशातही ती वर्क आउटसाठी यास्मीन कराचीवाला हिच्याकडून ट्रेनिंग घेते. यासाठी ती महिन्याकाठी तिला ४५ हजार रुपये देते. 



जॅकलीन फर्नांडिस
ट्रेनर : सिंडी जॉर्डेन
मालिक शुल्क ३०००० रुपये

बॉलिवूडची आणखी एक फिट अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडिसला ओळखले जाते. जॅकलीनला सिंडी जॉर्डेन ट्रेनिंग देते. याकरिता ती सिंडीला महिन्याकाठी ३० हजार रुपये देते. जॅकलीन आगामी ‘जुडवा-२’मध्ये बघावयास मिळणार असून, चित्रपटात ती खूपच फिट दिसणार आहे. 



कंगना राणौत
ट्रेनर : नम्रता पुरोहित
मासिक शुल्क : ६५००० रुपये

अभिनेत्री कंगनाने नेहमीच तिच्या मुलाखतींमध्ये म्हटले की, तिला फिट राहणे पसंत आहे. तिच्या दैनंदिन जीवनात ती योगाला प्रचंड महत्त्व देते. या व्यतिरिक्त ती नियमितपणे जीमलादेखील जात असते. कंगनाला नम्रता पुरोहित ट्रेनिंग देत असून, यासाठी ती महिन्याकाठी ६५ हजार रुपये मोजते. 



बिपाशा बसू
ट्रेनर : यास्मीन कराचीवाला
मासिक शुल्क : ४५००० रुपये

अभिनेत्री तथा बॉक्सर बिपाशा बसू ही तिच्या फिगरबाबत नेहमीच सतर्क असते. यासाठी ती पती सुनील ग्रोव्हरसोबत नेहमीच जीममध्ये जात असते. बिपाशाला यास्मीन ट्रेनिंग देत असून, त्यासाठी ती तिला महिन्याकाठी ४५ हजार रुपये देत असते. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी बिपाशाचा फिगर जसा होता, तसाच आजही बघावयास मिळतो. 



श्रद्धा कपूर 
ट्रेनर : सिंडी जॉर्डेन
मासिक शुल्क : ३०००० रुपये

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा फिगर तिच्या चाहत्यांना वेड लावणारा आहे. यासाठी ती नियमितपणे जीममध्ये घाम गाळत असते. श्रद्धाला वर्कआउटसाठी सिंडी जॉर्डेन ट्रेनिंग देते. यासाठी श्रद्धा तिला ३० हजार रुपये देत असते. सिंडीची दिवसाला दोन हजार रुपयांच्या आसपास फिस असून, १२ क्लासेसचे ती १५ हजार रुपये घेते. 

Web Title: ... this actress slam the trainer for slim figure 'so many' rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.