अभिनेत्री प्रीती झिंटाने संपूर्ण कुटुंबासोबत पाहिला The Kashmir Files, म्हणाली-आवर्जून पाहावा असा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:58 AM2022-03-25T10:58:33+5:302022-03-25T11:00:48+5:30

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचे दोन आठवड्यांनंतरही अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल सुरू आहेत.

Actress Preity Zinta watched The Kashmir Files with her entire family, a must-see movie | अभिनेत्री प्रीती झिंटाने संपूर्ण कुटुंबासोबत पाहिला The Kashmir Files, म्हणाली-आवर्जून पाहावा असा सिनेमा

अभिनेत्री प्रीती झिंटाने संपूर्ण कुटुंबासोबत पाहिला The Kashmir Files, म्हणाली-आवर्जून पाहावा असा सिनेमा

googlenewsNext

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files Box Office Collection)  हा चित्रपट दोन आठवड्यांनंतरही थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. सर्वसामान्य ते बॉलिवूड सेलिब्रिटीही या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटाही 'द काश्मीर फाइल्स' पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली. प्रीती (Preity Zinta Family) सोबतही त्याचे कुटुंब होते.  प्रीतीने तिच्या  इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आणि सांगितले की ती 3 वर्षांत पहिल्यांदा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेली होती.  

प्रिती झिंटाने तिच्या कुटुंबासह 'द काश्मीर फाइल्स' पाहिला. या चित्रपटाबद्दल आणि इतक्या वर्षांनंतर सिनेमागृहात जाण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचेही तिने सांगितले. तिने चित्रपटातील सर्व कलाकारांचे कौतुक केले. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी तिने विवेक अग्निहोत्रींचेही कौतुक केले. एवढेच नाही तर लोकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही प्रीतीने केलं आहे.

प्रिती झिंटा तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, "जवळपास 3 वर्षांनंतर चित्रपटगृहात जाण्यासाठी उत्सुक आहे. 'द काश्मीर फाइल्स' पाहिला आणि चित्रपट पाहून थक्क झाले. विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती आणि संपूर्ण कलाकार आणि क्रू ला दमदार चित्रपटासाठी सॅल्यूट.'' प्रिती झिंटाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुढे लिहिले की, “मित्रांनो हा चित्रपट चुकवू नका. 'द काश्मीर फाइल्स' जरूर पहा. 

Web Title: Actress Preity Zinta watched The Kashmir Files with her entire family, a must-see movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.