माधुरीच्या पतीने गायलं गाणं; डॉ. नेनेंच्या आवाजाचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले-तुम्ही तर Ed Sheeran...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:04 PM2024-04-05T12:04:29+5:302024-04-05T12:07:47+5:30

हॉलिवूड गायक एड शीरनचं 'परफेक्ट' हे गाणं माधुरी आणि डॉ.नेने यांनी गायलं. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

actress madhuri dixit husband dr sriram nene ed sheeran song netizens praises him | माधुरीच्या पतीने गायलं गाणं; डॉ. नेनेंच्या आवाजाचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले-तुम्ही तर Ed Sheeran...

माधुरीच्या पतीने गायलं गाणं; डॉ. नेनेंच्या आवाजाचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले-तुम्ही तर Ed Sheeran...

अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी बॉलिवूडची धक धक गर्ल आजही तितकीच सुंदर दिसते. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या माधुरी दीक्षितचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्रेक्षक केवळ माधुरीचे नाही तर तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांचेही फॅन आहेत. माधुरी आणि डॉ. नेने यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

डॉ. नेने पत्नीप्रमाणेच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. कुटुंबीयांबरोबरचे फोटो ते अनेकदा शेअर करताना दिसतात. नुकतंच त्यांनी माधुरीबरोबरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते दोघंही रोमँटिक गाणं गाताना दिसत आहेत. हॉलिवूड गायक एड शीरनचं 'परफेक्ट' हे गाणं माधुरी आणि डॉ.नेने गाताना दिसत आहेत. या व्हिडिओला त्यांनी सुंदर कॅप्शनही दिलं आहे. "परफेक्ट हे गाणं गाताना खूप मजा आली...आमच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे," असं कॅप्शन नेनेंनी दिलं आहे. 

माधुरीच्या पतीला गाताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी डॉ. नेने यांचं कौतुक केलं आहे. "तुम्ही एड शीरनला तगडी टक्कर देत आहात", "वाह! डॉ. नेने पण गातात हे माहित नव्हतं", "किती छान गात आहेत..माधुरी पण गाते हे माहित नव्हतं", "तुम्ही दोघं पण भारी आहात", अशा कमेंट त्यांच्या व्हिडिओवर केल्या आहेत. 

Web Title: actress madhuri dixit husband dr sriram nene ed sheeran song netizens praises him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.