see pics : अदा शर्मावर का आली रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 09:28 PM2018-08-22T21:28:30+5:302018-08-22T21:30:33+5:30

अलीकडे अदा शर्मा ही हॉट अभिनेत्री रस्त्यांवर भाजीपाला विकताना दिसली.

actress Adah Sharma was snapped selling vegetables on the streets | see pics : अदा शर्मावर का आली रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ?

see pics : अदा शर्मावर का आली रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने २००८ मध्ये ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटाने अदा शर्मा या नावाला एक नवी ओळख दिली.   यानंतर चार वर्षे अदा कुठल्याच चित्रपटात दिसली नाही. चार वर्षांनंतर ‘हसी तो फसी’ या चित्रपटातून तिन वापसी केली.   हा चित्रपट आपटला आणि अदाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोचाृ वळवला.२०१४ ते २०१५ या एका वर्षांत साऊथच्या सहा चित्रपटांत ती झळकली. या काळात अदाचे फॅन फॉलोर्इंग वाढले. पण अलीकडे ही हॉट अभिनेत्री रस्त्यांवर भाजीपाला विकताना दिसली.

 होय, तुम्ही वाचले ते अगदी बरोबर आहे. मळकी साडी, विस्कटलेले केस अशा अवतारात रस्त्यावर भाजीपाला विकतानाचे अदाचे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला. अदावर भाजीपाला विकण्याची वेळ का यावी, हा प्रश्न अनेकांना पडला. 

पण घाबरू नका. अदावर अशी कुठलीही वेळ आली नाही. कारण अदा रस्त्यावर भाजीपाला विकत नव्हती तर एका हॉलिवूड चित्रपटासाठी लूक टेस्ट देत होती. याचदरम्यानचे तिचे हे फोटो आहेत.
नुकतीच अदा शर्मा ‘कमांडो2’मध्ये झळकली होती. या चित्रपटात विद्युत जामवाल लीड रोलमध्ये होता.

 

Web Title: actress Adah Sharma was snapped selling vegetables on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.