विनोद खन्ना यांनी लॉन्च केलेल्या ‘या’ अभिनेत्रीने अभिनय सोडून करिनाच्या बॉयफ्रेंडशी केले लग्न !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 21:00 IST2017-08-09T15:11:30+5:302017-08-09T21:00:26+5:30

अभिनेता सलमान खान, काजोल आणि अरबाज खानचा ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट तुम्हाला आठवतो काय ? या ...

Actor Vinod Khanna launches Bollywood actress for her wedding! | विनोद खन्ना यांनी लॉन्च केलेल्या ‘या’ अभिनेत्रीने अभिनय सोडून करिनाच्या बॉयफ्रेंडशी केले लग्न !!

विनोद खन्ना यांनी लॉन्च केलेल्या ‘या’ अभिनेत्रीने अभिनय सोडून करिनाच्या बॉयफ्रेंडशी केले लग्न !!

िनेता सलमान खान, काजोल आणि अरबाज खानचा ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट तुम्हाला आठवतो काय ? या चित्रपटात अरबाज खानच्या प्रेमिकेची एका अभिनेत्रीने भूमिका साकारली. चित्रपटात ती काजोलची मैत्रीणही दाखविण्यात आली. होय, तुम्ही अगदी बरोबर विचार करीत आहात. अंजला जावेरी असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. मोजक्याच चित्रपटातून झळकलेली अंजला हिच्या बॉलिवूड करिअरची कथा खूपच मजेशीर आहे. 



अंजलाला दिवंगत अभिनेते विनोद खन्ना हिने बॉलिवूडमध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून लॉन्च केले होते. पुढे तिने काही चित्रपटांमध्ये नशीब अजमाविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात तिला फारसे यश मिळाले नाही. अंजलाच्या नावे केवळ एकच ‘प्यार किया तो डरना क्या’ हा हिट चित्रपट आहे. चित्रपटांमध्ये सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे तिने इंडस्ट्रीपासून दूर जाणे पसंत केले. बॉलिवूड सोडल्यानंतर अंजला जावेरी हिने काही तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर तिने लग्न केले. 



अंजलाने मॉडेल आणि अभिनेता तरुण अरोडा याच्याबरोबर लग्न केले. तरुण अरोडा तोच अभिनेता आहे, ज्याने ‘जब वी मेट’ या चित्रपटात करिना कपूरच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती. आज अंजला जावेरी वैवाहिक जीवन जगत असून, तिच्या संसारात खूश आहे. एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांचा सामना केल्यानंतर बॉलिवूडला सोडचिठ्ठी देणारी अंजला बॉलिवूडमध्ये फारशी परिचित नसली तरी, साउथ इंडस्ट्रीमध्ये तिचा आजही बोलबाला आहे. 



कारण साउथमध्ये अंजलाने तामिळ, तेलगूसह कन्नड भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले. तिचे बहुतांश चित्रपट हिट राहिल्यामुळे साउथमध्ये तिच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. लोकप्रियतेचा विचार केल्यास अंजला आजही साउथच्या अभिनेत्रींच्या बरोबरीने आहे. 

Web Title: Actor Vinod Khanna launches Bollywood actress for her wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.