दिवाळीनंतर आर्यनला 'मन्नत'मधून शिफ्ट करणार शाहरुख खान? जाणून घ्या, कुठे असू शकते नवे ठिकाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:17 IST2021-10-31T19:17:05+5:302021-10-31T19:17:34+5:30
आर्यन खानची अनेक अटींवर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आर्यन परवानगीशिवाय बृहन्मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. त्याला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करावा लागेल, त्यामुळे तो भारताबाहेरही जाऊ शकणार नाही.

दिवाळीनंतर आर्यनला 'मन्नत'मधून शिफ्ट करणार शाहरुख खान? जाणून घ्या, कुठे असू शकते नवे ठिकाण
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला जवळपास महिनाभरानंतर म्हणजेच ३० ऑक्टोबरला जामीन मिळाला आणि त्याची तुरुंगातून सुटका झाली. आर्यन परतल्यावर शाहरुखचे घर मन्नत सजवण्यात आले आहे. गेला महिना शाहरुखसाठी बराच कठीण होता. आता वृत्त आहे, की शाहरूख आणि गौरी आर्यनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलत आहेत आणि त्याला माध्यमांपासूनही दूर ठेवत आहेत.
बॉलीवूड लाईफच्या वृत्तानुसार, शाहरुख खान दिवाळीनंतर आर्यनला मन्नतमधून दुसरीकडे शिफ्ट करू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सणासुदीनंतर शाहरुख आर्यनला त्याच्या अलिबाग येथील फार्महाऊसवर शिफ्ट करू शकतो. अलिबाग येथे शाहरुखची आलिशान प्रॉपर्टी आहे. तेथे आर्यन कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीपासून दूर राहू शकतो. आर्यन पुन्हा नॉर्मल व्हावा यासाठी शाहरुखने हा निर्णय घेतला आहे.
आर्यन खानची अनेक अटींवर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आर्यन परवानगीशिवाय बृहन्मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. त्याला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करावा लागेल, त्यामुळे तो भारताबाहेरही जाऊ शकणार नाही. आर्यनला दर आठवड्याला एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. तसेच तो मीडिया अथवा सोशल मीडियावरही कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करू शकत नाही. एवढेच नाही, तर ड्रग्स प्रकरणातील इतर आरोपींशी बोलण्यासही आर्यनला बंदी करण्यात आली आहे.