सचिन पिळगावकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत, 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मधील पहिला लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:28 PM2024-03-20T17:28:41+5:302024-03-20T17:30:08+5:30

'स्वातंत्र्यवीर सावरकर'मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत सचिन पिळगावकर, पहिला लूक पाहून व्हाल थक्क

actor sachin pilgaonkar playing the role of Netaji subhash chandra Bose SwatantryaVeer Savarkar movie | सचिन पिळगावकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत, 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मधील पहिला लूक समोर

सचिन पिळगावकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत, 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मधील पहिला लूक समोर

रणदीप हूडाच्या आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीपने किती मेहनत घेतलीय, हे सर्वांनी बघितलंच आहे. दोनच दिवसांत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा रिलीज होतोय. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' बद्दल एक महत्वाची बातमी समोर येतेय. जी वाचून मराठी लोकांना नक्कीच आनंद होईल. ती म्हणजे 'स्वातंत्र्यवीर सावरकर' मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता झळकणार आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या टीमने सिनेमातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका असलेलं पोस्टर शेअर केलंय. या पोस्टरमध्ये अभिनेते सचिन पिळगावकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत दिसून येत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत सचिन ओळखूच येत नाही आहेत. सचिन यांच्या अभिनयाची झलक 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या ट्रेलरमध्येही दिसून आली. पण सचिन यांना कोणीच ओळखू शकलं नाही हे विशेष.

सचिन पिळगावकर यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २२ मार्चला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमात रणदीप हूडा, अंकीता लोखंडे, अमित सियाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. रणदीप हूडानेच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे.

Web Title: actor sachin pilgaonkar playing the role of Netaji subhash chandra Bose SwatantryaVeer Savarkar movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.