​'या' अभिनेत्याने केले आपल्याच मुलाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:07 IST2017-09-13T07:20:31+5:302017-09-13T13:07:50+5:30

एका अभिनेत्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीने आपल्याच मुलाचे अपहरण केले होते. पोलिसांनी आता या अभिनेत्याला आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली ...

'The actor kidnapped his own son' | ​'या' अभिनेत्याने केले आपल्याच मुलाचे अपहरण

​'या' अभिनेत्याने केले आपल्याच मुलाचे अपहरण

ा अभिनेत्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीने आपल्याच मुलाचे अपहरण केले होते. पोलिसांनी आता या अभिनेत्याला आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली असून हा एक भोजपूरी अभिनेता आहे. त्याने अनेक प्रसिद्ध भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एक चांगला डान्सर असून तो अनेक भोजपूरी अल्बममध्ये देखील झळकला आहे. 
मोहम्मद शाहीद असे या अभिनेत्याचे नाव असून त्याने त्याच्या मुलाचे अडीज महिन्यांपूर्वी अपहरण केले होते. शाहिदचे मुस्कानसोबत लग्न झाले होते. पण त्या दोघांचे पटत नसल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर त्यांच्या मुलाचा ताबा मुस्कानकडे गेला. पण शाहिदला आपल्या मुलाला आपल्यासोबतच ठेवायचे होते. त्यामुळेच त्याने मुलाच्या अपहरणाचा डाव रचला. 
शाहिद सोबत घटस्फोट झाल्यानंतर मुस्कानने दीड वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले तर शाहिद सध्या कशिश उर्फ अलिशा या मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहे. कशिशच्याच मदतीने शाहिदने त्याच्या मुलाला पळवण्याचा डाव रचला.

bhojpuri actor

शाहिद आणि त्याची पूर्व पत्नी दोघेही दिल्लीचे आहेत. त्याने साऊथ दिल्लीमधील बाटला हाऊसमधून मुलाचे अपहरण केले. या बाटला हाऊसमध्ये एक मार्केट आहे. ईद जवळ आल्यामुळे मुस्कानची आई तिच्या नातवाला म्हणजेच शाहीद आणि मुस्कानच्या मुलाला शॉपिंगसाठी तिथे घेऊन गेली होती. पण या मार्केटमध्ये त्या दिवशी खूपच गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊनच मोहोम्मदने त्याला पळवले. मुस्कानच्या आईनेच मुलगा हरवल्याची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तसेच शाहिद त्यावेळी त्या मार्केटमध्ये उपस्थित असल्याचेही पोलिसांना सांगितले होते. पण कशिशने मुलाचे अपहरण केले असेल, मला मुलाबद्दल काहीही माहीत नाही असेच तो पोलिसांना सतत सांगत होता. पोलिसांना तो सतत चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत होता. पण या अपहरणात शाहिदच सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे शाहिद त्याच्या प्रेयसीसोबत दिल्लीत कुठे राहातोय त्याचा शोध घेऊन तिथे पोलिस गेले तर तिथे मुस्कानचा मुलगा होता. त्यांनी दिल्लीतील विनोद नगर परिसरातील एका घरातून त्या मुलाची सुटका केली. आता मुलगा पुन्हा आईला सोपावण्यात आला आहे. शाहिद आणि त्याची प्रेयसी कशिशला पोलिसांनी या गुन्ह्यासाठी अटक देखील केली आहे. 

Web Title: 'The actor kidnapped his own son'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.