कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफान खान परतणार कामावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:38 AM2019-04-04T11:38:22+5:302019-04-04T11:41:31+5:30

इरफान खान लवकरच हिंदी मीडियम 2 सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राजस्थानमध्ये राधिका मदनने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

Actor irrfan khan will start the shooting of hindi medium 2 soon | कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफान खान परतणार कामावर

कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफान खान परतणार कामावर

googlenewsNext
ठळक मुद्दे इरफान पुढच्या आठवड्यात शूटिंगला सुरुवात करणार आहेराधिका सिनेमात इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे

इरफान खान लवकरच हिंदी मीडियम 2 सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राजस्थानमध्ये राधिका मदनने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार इरफान पुढच्या आठवड्यात शूटिंगला सुरुवात करणार आहे. राधिका सिनेमात इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. पहिल्या शेड्यूलचे शूटिंग संपल्यानंतर दोघे इंटरनॅशनल शेड्यूलच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहेत. आधी अमेरिका आणि नंतर लंडनमध्ये शूट होणार आहे. 


रिपोर्टनुसार करिना कपूर यात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. करिना यात पोलिस अधिका-याची भूमिका साकारणार आहे. २०१७ मध्ये इरफानचा ‘इंग्लिश मीडियम’ प्रदर्शित झाला होता. यात त्याच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. या  सिनेमाने ३०० कोटींचा बिझनेस करत अनेकांना आश्चर्याला धक्का दिला होता. 


त्यामुळे लगेच मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु केली होती. पण याचदरम्यान इरफानला न्युरोएंडोक्राईन ट्युमर कॅन्सरचे निदान झाले होते. यावरच्या उपचारासाठी इरफान लंडनला रवाना झाला होता. पण आता इरफान भारतात परतला आहे आणि आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी तयार आहे. नुकताच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. जवळपास ९ ते १० महिन्यांच्या उपचारानंतर इरफान खान बरा झाला आहे.त्यामुळे तो आता लवकरच कामावर परतणार आहे.  

Web Title: Actor irrfan khan will start the shooting of hindi medium 2 soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.