अभिनेता अक्षय कुमारची हिरोईन एमी जॅक्सन लेस्बियन तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 15:01 IST2018-06-10T09:31:17+5:302018-06-10T15:01:17+5:30

अभिनेता अक्षय कुमारची हिरोईन एमी जॅक्सन सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. होय, एमीने स्वत:च्या सोशल अकाऊंटवर एक फोटो ...

Actor Akshay Kumar's heroine is Amy Jackson Lesbian? | अभिनेता अक्षय कुमारची हिरोईन एमी जॅक्सन लेस्बियन तर नाही?

अभिनेता अक्षय कुमारची हिरोईन एमी जॅक्सन लेस्बियन तर नाही?

िनेता अक्षय कुमारची हिरोईन एमी जॅक्सन सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. होय, एमीने स्वत:च्या सोशल अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोत एमीसोबत तिची मैत्रिण आहे. दोघीही फोटोत अतिशय सुंदर दिसताहेत. एमी मैत्रिणीला मागून अलिंगन देताना यात दिसतेय. पण या फोटोसोबतचे कॅप्शन सर्वाधिक धक्कादायक आहे. ‘वाईफ लाईफ’, असे कॅप्शन एमीने या फोटोला दिले आहे.



साहजिकचं हा फोटो आणि कॅप्शन पाहून चाहत्यांना एक प्रश्न पडला आहे. तो म्हणजे, एमी लेस्बियन तर नाही? अनेक चाहत्यांनी एमीला थेट हा सवाल केला आहे. अर्थात एमीने अद्याप याचे कुठलेही उत्तर दिलेले नाही.


एमीसोबतची फोटोतील मुलगी युकेची मॉडेल नीलम गिल आहे. नीलमनेही एमीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, तिने दिलेले कॅप्शन पाहूनही अनेकांना धक्का बसला आहे. ‘लाईफ बॉल विद वाइफी एमी जॅक्सन...’असे तिने लिहिले आहे. या फोटोसोबत तिने दोन वधूंची ईमोजीही टाकली आहे.
एमी तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे.  लैंगिकतेबाबत बोलायलाही ती कधीच घाबरत नाही. माझी एक बेस्ट फ्रेन्ड लेस्बियन आहे, असे तिने एकदा म्हटले होते. आता ही बेस्ट फेन्ड नीलम तर नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.
मध्यंतरी एमी ही अब्जाधीश जॉर्ज पानायिटूसोबत लग्न करणार, अशी बातमी होती. जॉर्ज हा ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा आहे. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे.  एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली, असे मानले जात होते,   या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल  झाले होते.

 ALSO READ : एमी जॅक्सनला लगीनघाई! अब्जाधीश बॉयफ्रेन्डशी बांधणार लग्नगाठ!!
 

Web Title: Actor Akshay Kumar's heroine is Amy Jackson Lesbian?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.