गोव्यात एकटीच हॉलिडे एन्जॉय करताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; गुपचूप केले होते लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 16:20 IST2018-01-27T10:50:14+5:302018-01-27T16:20:14+5:30

अभिनेत्री रिया सेन सध्या एकटीच गोव्यात हॉलिडे एन्जॉय करीत आहे. नुकताच तिने बिचवरील एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये ती ...

Actor acted as 'only' while enjoying the only holiday in Goa; The wedding was done secretly! | गोव्यात एकटीच हॉलिडे एन्जॉय करताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; गुपचूप केले होते लग्न!

गोव्यात एकटीच हॉलिडे एन्जॉय करताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; गुपचूप केले होते लग्न!

िनेत्री रिया सेन सध्या एकटीच गोव्यात हॉलिडे एन्जॉय करीत आहे. नुकताच तिने बिचवरील एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये ती टू-पीस बिकिनीमध्ये अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये बघावयास मिळत आहे. हा फोटो पोस्ट करताना रियाने लिहिले की, ‘...’ गुपचूप लग्न करणारी रिया लग्नानंतर पहिल्यांदाच बिकिनी अंदाजात बघावयास मिळाली. 



‘स्टाइल’, शादी नंबर-१, पेइंग गेस्ट’ आदी चित्रपटांमध्ये काम करणाºया रियाने १६ आॅगस्ट २०१७ रोजी बॉयफ्रेंड शिवम तिवारी याच्यासोबत गुपचूप लग्न केले. रिया-शिवमच्या लग्नात सर्व विधी बंगाली रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. लग्नाची बातमी स्वत: रियानेच तिच्या सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना दिली. पुणे येथे पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. 



रियाचा पती शिवम तिवारी एक फोटोग्राफर असून, तो नेहमीच ट्रॅव्हल ट्रिप आणि डेस्टिनेशंसचे फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. दरम्यान, रियाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास नुकतीच ती एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २.२’ या वेबसिरीजमध्ये बघावयास मिळाली होती. मोठ्या पडद्यावर ती अखेरीस अग्निदेव चॅटर्जी दिग्दर्शित ‘डार्क चॉकलेट’ या बंगाली चित्रपटात बघावयास मिळाली होती. हा चित्रपट शीना बोरा हत्याकांडावर आधारित होता. 

Web Title: Actor acted as 'only' while enjoying the only holiday in Goa; The wedding was done secretly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.