गौहर खानच्या मते, या आहेत बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 15:16 IST2017-08-01T09:03:38+5:302017-08-01T15:16:01+5:30

मॉडलिंग जगतातून अभिनय क्षेत्रात नाव कमवित असलेली अभिनेत्री गौहर खानने नुकतेच बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींची नावे सांगितली आहेत. ...

According to Gauhar Khan, these are Bollywood's most fitted actresses in Hollywood! | गौहर खानच्या मते, या आहेत बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री !

गौहर खानच्या मते, या आहेत बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री !

डलिंग जगतातून अभिनय क्षेत्रात नाव कमवित असलेली अभिनेत्री गौहर खानने नुकतेच बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींची नावे सांगितली आहेत. तिच्या मते, बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफ, तर हॉलिवूडमध्ये जेनिफर लोपेज या सगळ्यांत फिट अभिनेत्री आहेत. ‘बिग बॉस-७’ची विनर ठरलेल्या गौहरने एका वेबसाइटशी बोलताना म्हटले की, माझ्या मते जगात सर्वांत फिट अभिनेत्री जेनिफर लोपेज आहे. वयाच्या ४८व्या वर्षीही ती तेवढ्याच तंदुरुस्तने इंडस्ट्रीत टिकून आहे. खरं तर तिच्याकडे बघून तिच्या वयाचा अंदाज बांधणे मुश्किल आहे. ती खूपच फिट आणि हॉट आहे. 



तर बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफच्या फिटनेसचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कॅटरिना तिच्या बॉडीला मेण्टेंन ठेवण्यासाठी डान्सचा आधार घेते. तसा प्रयत्न मी ेखील करीत असते. त्यामुळेच माझ्या मते, कॅटरिना इंडस्ट्रीमध्ये फिट असलेली अभिनेत्री आहे. यावेळी गौहरने असेही म्हटले की, मीदेखील नियमित एक्सरसाइज करीत असते. फिटनेसवर लक्ष देण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करीत असते. यावेळी गौहरने तिचा फिटनेस मंत्राही सांगितला. 



गौहरने म्हटले की, ‘योग्य मात्रांमध्ये आहार घेतल्यास तुम्हाला फिटनेस मेण्टेंन ठेवणे शक्य होते. सद्यस्थितीत आपल्याकडे भेसळयुक्त खाद्यपदार्थ आहेत. त्यामुळे आहाराविषयी तुम्ही नेहमीच सतर्क राहायला हवे. गौहरने म्हटले की, मला आनंद होत आहे की, सर्वसामान्य लोकदेखील डायट कॉन्सियस आहेत. गौहर ‘बिग बॉस’च्या सातव्या सीजनमधून प्रकाशझोतात आली होती. बिग बॉसच्या घरातील तिचा वावर खूपच चर्चिला गेला होता. कुशल टंडनबरोबरचे तिचे अफेअर त्यावेळी चांगलेच गाजले होते. त्याचबरोबर तनिषा मुखर्जीबरोबरची तिची कॅटफाइट आजही तिच्या चाहत्यांच्या स्मरणात असेल. 

Web Title: According to Gauhar Khan, these are Bollywood's most fitted actresses in Hollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.