​अवार्ड व्हेन्यूबाहेर कल्कीसोबत गैरवर्तन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 17:54 IST2016-05-06T12:24:44+5:302016-05-06T17:54:44+5:30

दिल्लीच्या विज्ञान भवनात अलीकडे ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री कल्कि कोचलीन हिला ...

Abuse outside the award venue with Kalki! | ​अवार्ड व्हेन्यूबाहेर कल्कीसोबत गैरवर्तन!!

​अवार्ड व्हेन्यूबाहेर कल्कीसोबत गैरवर्तन!!

ल्लीच्या विज्ञान भवनात अलीकडे ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री कल्कि कोचलीन हिला ‘मार्गारेट विद अ स्ट्रॉ’ या चित्रपटातील अभिनयासाठी स्पेशल ज्यूरी अवार्डने सन्मानित करण्यात आले. हा क्षण निश्चितपणे कल्किसाठी आनंददायी क्षण होता. पण पुरस्कार स्वीकारल्यानंतर काही क्षणातच तिच्या या आनंदावर विरजण पडले. एका पोर्टलने दिलेल्या बातमीनुसार, नॅशनल अवार्ड विनर कल्किसोबत नॅशनल अवार्ड वेन्यूबाहेर छेडछाड केली गली. सेरेमनी संपल्यानंतर कल्की आपल्या कारकडे निघाली होती. तिच्या पाठोपाठ एक सुरक्षाकर्मचारीही होता. मात्र अचानक हा सुरक्षारक्षक कल्कीला सोडून अमिताभ आणि कंगना रानोट यांच्याकडे वळला. यादरम्यान लोकांची गर्दी आपल्यापर्यंत पोहोचल्याचे कल्कीच्या लक्षात आले. पण तिच्या मदतीसाठी तिथे कुठलीही सुरक्षा नव्हती. या गर्दीतील काही लोकांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे कल्कीने म्हटले आहे. यासंदर्भात पोलिस तक्रार करण्याचे कल्कीने ठरवले होते. पण नंतर काहीसा विचार केल्यानंतर तिने असे न करता आयोजकांकडे यासंदर्भात तक्रार केली.

Web Title: Abuse outside the award venue with Kalki!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.