अबब...सोनू सूदच्या चित्रपटाने कमाविले १२०० कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 21:38 IST2017-02-11T16:08:49+5:302017-02-11T21:38:49+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ आणि ‘पीके’ या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ७०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. ...

अबब...सोनू सूदच्या चित्रपटाने कमाविले १२०० कोटी!
ब लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ आणि ‘पीके’ या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ७०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. इतर कलावंत आमिरच्या आसपासही नाही असे मानले जाते. मात्र सोनू सूदच्या चित्रपटाने आमिर खानला देखील मागे टाकले आहे. आतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनू सूदच्या चित्रपटाने १२०० कोटींची कमाई केली आहे.
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद, दिशा पटानी आणि आतरराष्ट्रीय स्टार जॅकी चॅन यांच्या ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स सपाटून मार खाल्ला असला तरीही या चित्रपटाने चीनमध्ये बक्कळ कमाई केली आहे. ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाने चीनमध्ये जवळपास १७९ मिलियन डॉलर कमाई केली आहे. १७९ मिलियन डॉलरचे भारतीय मूल्यात रुपांतरण केल्यास हा आकडा जवळपास १२०० कोटी इतका होतो. भारतात आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाने इतकी कमाई केलेली नाही.
![]()
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॅकी चॅन स्वत: भारतात आला होता. यासाठी त्याने सलमान खानची मदत घेतली होती. हृतिक रोशनचा काबिल व शाहरुख खानच्या रईस या चित्रपटांसमोर कुंग फू योगा फारशी कमाल दाखवू शकला नाही. भारतात ‘कुंग फू योगा’ने फक्त चार कोटींची कमाई केली. हा चित्रपट भलेही भारतात चालला नाही. सोनू सूदचा सर्वांत हिट चित्रपट म्हणून ‘दबंग’चा उल्लेख केला जातो. भारतीय बॉक्स आॅफिसवर १०० कोटीच्या क्लबमध्ये असलेला सोनू एकाच झटक्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर १००० कोटीच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. यामुळे त्याने बॉलिवूडमधील खान त्रिकूटाला व अन्य मोठ्या स्टार्सना देखील मागे टाकले आहे.
जगभरात कुंग फू योगाला मिळालेला प्रतिसाद व प्रतिक्रिया यामुळे सोनू सूद आंनदी असेल यात शंकाच नाही. चित्रपट समीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने जगभरात १८० मिलियन डॉलर म्हणजेच १२०० कोटींची कमाई केली आहे. ‘कुंग फू योगा’चित्रपट भारतात ३ फेब्रुवारीला तर चीनमध्ये २८ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. ५ फेब्रुवारीपर्यंत चित्रपटाने ९४३ कोटींची कमाई केली होती.