अनुराग बासूच्या या सिनेमात अभिषेक बच्चन दिसणार सिंगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 13:12 IST2018-11-07T13:10:25+5:302018-11-07T13:12:48+5:30
अभिषेक बच्चन दिग्दर्शक अनुराग बासूचा चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो'च्या सीक्वलच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. या सिनेमात तो सिंगल दिसणार आहे.

अनुराग बासूच्या या सिनेमात अभिषेक बच्चन दिसणार सिंगल
अभिनेता अभिषेक बच्चनने दिग्दर्शक अनुराग बासूचा आगामी सिनेमा 'लाइफ इन अ मेट्रो'च्या सीक्वलच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. मात्र या सिनेमात अभिषेकसोबत कोणतीही नायिका दिसणार नाही. डीएनएच्या रिपोर्टनुसार, चित्रपटात अभिषेक बच्चनची भूमिका इतर पात्रांपेक्षा खूप वेगळी आहे. फक्त अभिषेकचे एकमेव असे पात्र आहे ज्याला रोमँटिक अँगल नाही. त्याने सिनेमातील काही भागांचे चित्रीकरण पूर्ण केले असून पुढील चित्रीकरण लवकरच सुरू करणार आहे.
गेल्या महिन्यात 'लाइफ इन अ मेट्रो'च्या सीक्वलचा सेट लीक झाला होता. अभिषेकचा या सिनेमातील लूक पाहून मणिरत्नम दिग्दर्शित 'युवा' चित्रपटाची आठवण झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, इतर कलाकारांच्या चित्रीकरणाच्या तारखा मिळाल्या नाहीत. अभिषेकला चित्रीकरण करणे सोप्पे गेले कारण त्याच्या अपोझिट कोणी नायिका नाही. इतर स्टारकास्टमध्ये आदित्य रॉय कपूर, सैफ अली खान व राजकुमार राव हे दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यामुळे त्यांच्या तारखा मिळत नाही आहेत. त्यांचे प्रोजेक्टचे काम आटोपल्यानंतर ते या सिनेमाच्या चित्रीकरण सुरू करणार आहे.
नुकतेच अभिषेक पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस साजरा करून गोव्यावरून परतला आहे. ऐश्वर्याच्या वाढदिवसासाठी त्याने चित्रीकरणातून ब्रेक घेतला होता. शूटिंगवरून मुंबईत ऐश्वर्याच्या कुटुंबासमवेत केक कापून सकाळी गोव्यासाठी ते रवाना झाले होते.