​साहिर लुधियानवीच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन - प्रियांका चोप्राची वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 13:31 IST2017-04-30T08:01:49+5:302017-04-30T13:31:49+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून भन्साळींच्या डोक्यात एक कथा आकार घेते आहे. ...

Abhishek Bachchan - Priyanka Chopra's character in Sahir Ludhianvi's biopic? | ​साहिर लुधियानवीच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन - प्रियांका चोप्राची वर्णी?

​साहिर लुधियानवीच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन - प्रियांका चोप्राची वर्णी?

ग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून भन्साळींच्या डोक्यात एक कथा आकार घेते आहे. ही कथा आहे, बॉलिवूडचे गाजलेले गीतकार, कवी साहिर लुधियानवी यांची. साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावर चित्रपट काढावा, अशी भन्साळींची इच्छा आहे आणि कदाचित लवकरच त्यांची इच्छापूर्ती होईल, असे दिसतेय. होय, भन्साळींना या चित्रपटासाठी त्यांची स्टारकास्ट मिळालीय. आधी या चित्रपटात साहिर लुधियानवी यांची भूमिका शाहरूख खान साकारणार, अशी चर्चा रंगली होती. पण कदाचित ‘बात कुछ बनी नहीं’. आता या चित्रपटात शाहरूखऐवजी अभिषेक बच्चन यांची वर्णी लागल्याची खबर आहे. केवळ एवढेच नाही तर अभिषेकसोबत प्रियांका चोप्रा हिची वर्णी लागणार, असेही कळतेय. अभिषेक साहिर लुधियानवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रियांका त्यांच्या प्रेयसीच्या. अर्थात या बातमीला भन्साळींच्या कंपूने अद्याप दुजोरा दिलेला नाही. अभिषेक व प्रियांका या दोघांनी याआधीही एकत्र काम केले आहे. रोहन सिप्पींच्या ‘ब्लफ मास्टर’ आणि गोल्डी बहलच्या ‘द्रोणा’मध्ये हे दोघे एकत्र दिसले होते.

ALSO READ : शाहरूख खान व संजय लीला भन्साळी १६ वर्षांनंतर करणार ‘गुस्ताखियां’

साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी होते. त्यांचे अनेक लव्ह अफेअर्स झालेत. मात्र शेवटपर्यंत ते अविवाहित राहिले. लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम आणि गायिका तसेच अभिनेत्री सुधा मल्होत्रा यांच्यासोबतचे साहिर यांचे रिलेशनशिप बरेच चर्चेत राहिले. १९६३ मध्ये आलेल्या ‘ताजमहल’ या चित्रपटातील ‘जो वादा किया वो, निभाना पडेंगा’ या गाण्याचे बोल साहिर यांनी लिहिले होते. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यानंतर साहिर यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली.

Web Title: Abhishek Bachchan - Priyanka Chopra's character in Sahir Ludhianvi's biopic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.