अभि-अ‍ॅश करणार दुबईत थर्टी-फर्स्ट सेलिब्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:27 IST2016-12-15T16:27:36+5:302016-12-15T16:27:36+5:30

वर्ष संपायला तब्बल १५ दिवस बाकी असूनही ‘बी टाऊन’च्या सेलिब्रिटींचे ‘थर्टी  फर्स्ट’ प्लॅनिंग सुरू झाले आहे. काही जण पॅकिंग ...

Abhi-Ash will celebrate Thirty-First celebrity in Dubai! | अभि-अ‍ॅश करणार दुबईत थर्टी-फर्स्ट सेलिब्रेट!

अभि-अ‍ॅश करणार दुबईत थर्टी-फर्स्ट सेलिब्रेट!

्ष संपायला तब्बल १५ दिवस बाकी असूनही ‘बी टाऊन’च्या सेलिब्रिटींचे ‘थर्टी  फर्स्ट’ प्लॅनिंग सुरू झाले आहे. काही जण पॅकिंग करून भारताबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत तर काहींनी ‘थर्टी फर्स्ट’ पार्ट्यांचे नियोजनही आखले आहे. आता हेच पाहा ना, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांनी तर थर्टी-फर्स्ट दुबईत सेलिब्रेट करायचे ठरवून टाकले आहे. आराध्या बच्चनसह ते दोघे दुबईला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अभि-अ‍ॅश एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी वाटच पाहात असतात. ‘थर्टी-फर्स्ट’च्या निमित्ताने त्यांना बऱ्याच दिवसांनंतर एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतोय. दोनच दिवसांत ते त्यांच्या फेव्हरेट हॉलिडे डेस्टिनेशन - द युनायटेड स्टेट्स येथे जाणार आहेत. तिथे ते जवळपास जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत असतील. 

‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटानंतर ऐश्वर्याकडे कुठलाच प्रोजेक्ट नव्हता. मात्र, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी तिला ‘पद्मावती’ चित्रपटात एका पाहुण्या भूमिकेसाठी घेतले आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटानंतर अ‍ॅशने भन्साळींसोबत एकही चित्रपट केला नव्हता. आता तिला पद्मावतीच्या निमित्ताने ही संधी आलीय ती अ‍ॅश दवडणार नाही. 

Web Title: Abhi-Ash will celebrate Thirty-First celebrity in Dubai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.