अबब... कंगना राणौतने आदित्य पांचोलीचे हडपले तीस लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 17:50 IST2017-09-10T12:20:13+5:302017-09-10T17:50:13+5:30

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या तिच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र कंगना तिच्या चित्रपटापेक्षा पर्सनल लाइफमुळेच ...

Abh ... Kangana Ranaut, Aditya Pancholi's handcuffs worth thirty lakh rupees! | अबब... कंगना राणौतने आदित्य पांचोलीचे हडपले तीस लाख रुपये!

अबब... कंगना राणौतने आदित्य पांचोलीचे हडपले तीस लाख रुपये!

लिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या तिच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र कंगना तिच्या चित्रपटापेक्षा पर्सनल लाइफमुळेच अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका वृत्तवाहिनीवर हृतिक रोशन, अध्ययन सुमन आणि आदित्य पांचोली यांच्याविषयी मोठमोठे खुलासे केले होते. त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत त्यांची बदनामी करण्याची कुठलीही कसर कंगनाने सोडली नव्हती. आता कंगनाच्या या आरोपांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आदित्य पांचोली याने एक मोठा खुलासा केला आहे. 

कंगनाने एका शोदरम्यान, आदित्य पांचोलीने मला हाउस अरेस्ट करून मारझोड केली होती, असा आरोप केला होता. आता आदित्यने कंगनाच्या या आरोपाला उत्तर दिले आहे. त्याने म्हटले की, ‘कंगनाने माझ्याविषयी जे काही आरोप केले, त्यामध्ये काहीही सत्यता नाही. उलट कंगनाने घर खरेदी करण्यासाठी माझ्याकडे एक कोटी रुपये मागितले होते. त्यावेळी माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. अशातही त्यावेळी मी कंगनाला ५५ लाख कॅश दिले होते. तसेच मी कंगनाची बहीण रंगोली हिच्या प्लॅस्टिक सर्जरीवर दहा लाख रुपये खर्च केले होते. 



पुढे बोलताना आदित्यने म्हटले की, ‘जेव्हा बॉबी देओलसोबत कंगना ‘शाकालाका बूम बूम’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती, तेव्हा ती तिच्या को-स्टारशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती. मला जेव्हा ही बाब समजली तेव्हा मी तिच्यापासून दूर राहणे पसंत केले. जेव्हा मी दिलेले पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा कंगनाने मला केवळ २५ लाख रुपयेच परत केले. उर्वरित तीस लाख रुपये हडपले. वास्तविक मी तिला मदत केली होती, अशात तिने पैैसे परत देणे अपेक्षित होते. परंतु त्या पैशांविषयी ती एक शब्दही बोलत नाही. 

दरम्यान, आदित्यच्या या आरोपांवर आता कंगना कशा पद्धतीने उत्तर देणार हे बघणे मजेशीर ठरेल. सध्या कंगनाच्या निशाण्यावर केवळ आदित्यच नाही, तर अध्ययन सुमन आणि हृतिक रोशन यांच्याबरोबरही तिचा वाद सुरू आहे. या दोघांवरही तिने अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. त्यामुळे आता आदित्य पांचोलीप्रमाणे हे दोघेही कंगनाच्या आरोपांना उत्तरे देणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: Abh ... Kangana Ranaut, Aditya Pancholi's handcuffs worth thirty lakh rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.