अपघातामुळे फिल्मी दुनियेपासून दुरावली सलमान खानची ही ऑनस्क्रीन बहीण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 04:30 PM2020-05-03T16:30:42+5:302020-05-03T16:34:39+5:30

बॉलिवूडमध्ये अनेकजण येतात आणि आले तसे गायब होतात. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमातील अभिनेत्री अशीच एक अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब आहे. 

aashika bhatia who played salman khan sister in prem ratan dhan payo is now tiktok star-ram | अपघातामुळे फिल्मी दुनियेपासून दुरावली सलमान खानची ही ऑनस्क्रीन बहीण!!

अपघातामुळे फिल्मी दुनियेपासून दुरावली सलमान खानची ही ऑनस्क्रीन बहीण!!

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी आशिका व रोशन गुप्ताच्या डेटींगच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर ती बोलली. 

बॉलिवूडमध्ये अनेकजण येतात आणि आले तसे गायब होतात. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमातील अभिनेत्री अशीच एक अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब आहे. अर्थात यामागे कारण आहे अपघातानंतर तिच्यावर झालेली शस्त्रक्रिया. या अभिनेत्रीचे नाव आहे आशिका भाटिया. आशिकाने ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमासोबत मीरा, परवरीश अशा अनेक मालिकांत काम केले़. मात्र अपघात झाला आणि यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. यामुळे आशिका इंडस्ट्रीपासून दूर झाली. अर्थात तिने काम सोडलेले नाही. दुखापतीतून पूर्णपणे बरे झाल्यानंतर इंडस्ट्रीत परतण्याचा तिचा मनोदय आहे.

अलीकडे एका मुलाखतीत तिने स्वत: ही माहिती दिली. तिने सांगितले की, वषार्पूर्वी माझा एक अपघात झाला होता. यानंतर माझ्या  गुडघ्याची सर्जरी करावी लागली होती. या सर्जरीनंतर माझे काम पूर्णपणे थांबले आहे.  आता माझा पाय पूर्णपणे बरा झाला आह़. पण अद्यापही कधी कधी खूप वेदना होतात. मात्र मी परतणार, यावर मी ठाम आहे. 

मी माझ्या कामाला खूप मिस करते. अभिनय माझे पॅशन आहे आणि अभिनय मला कधीच सोडायचा नाही. तूर्तास मी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. टिक टॉकवर मी माझे काही व्हिडीओ शेअर करायला लागले आणि लोकांना ते प्रचंड आवडले. टिकटॉकने मला असंख्या चाहते दिलेत. फॅन्सकडून मिळालेले प्रेम आणि सपोर्टमुळे मला हे सुरु ठेवण्यास पाठबळ मिळाले आहे.

काही दिवसांपूर्वी आशिका व रोशन गुप्ताच्या डेटींगच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर ती बोलली. डेटींगच्या बातम्या तिने धुडकावून लावल्या. रोशन हा माझा केवळ एक चांगला मित्र आहे. यापेक्षा अधिक आमच्यात काहीही नाही. पण तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असेही तिने स्पष्ट केले.

Web Title: aashika bhatia who played salman khan sister in prem ratan dhan payo is now tiktok star-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.