बॉलिवूडचा मि. परफे क्शनिस्ट आमिर खानचा आगामी चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’मधला सिक्रेट लूक त्याच्या फॅन क्लबने नुकताच शेअर केला आहे. ...
आमिरचा ‘सिक्रेट...लूक’ व्हायरल !
/>बॉलिवूडचा मि. परफे क्शनिस्ट आमिर खानचा आगामी चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’मधला सिक्रेट लूक त्याच्या फॅन क्लबने नुकताच शेअर केला आहे. आमिरचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात आमिर पिळदार मिशा, बाल्बो स्टाईल दाढी लूकमध्ये दिसत आहे. पण यात विशेष लक्ष वेधले ते त्याच्या डोक्यावरील मोठमोठ्या क्लिप्सने. ‘मॅड मॅक्स’ या हॉलीवूड सिरीजमध्ये शक्यतो हे पाहावयास मिळते. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या फोटोतील आमिर खानचा हा लूक त्याच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटातील सिक्रेट लूक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रत्येक चित्रपटागणिक त्याच्या सर्व गोष्टींपैकी आपल्या शरीरयष्टीतील बदलासाठी आमिर नेहमीच प्रशंसेला पात्र ठरतो.