​ आमिर म्हणतो, मी आजही देशाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 05:51 IST2016-03-06T12:49:25+5:302016-03-06T05:51:22+5:30

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याला ‘अतुल्य भारत’ या मोहिमेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदावरून सरकारने काढले असले तरी खुद्द आमिरच्या लेखी मात्र ...

Aamir says, I am still the country's brand ambassador | ​ आमिर म्हणतो, मी आजही देशाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

​ आमिर म्हणतो, मी आजही देशाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

स्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याला ‘अतुल्य भारत’ या मोहिमेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदावरून सरकारने काढले असले तरी खुद्द आमिरच्या लेखी मात्र तो कालही देशाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होता आणि आजही आहे  ‘अतुल्य भारत’ या मोहिमेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपद माझ्याकडून काढून घेण्यात आले असले तरी, मी आजही या देशाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे व यापुढेही असेल, असे आमिर  एका मुलाखतीदरम्यान म्हणाला.
 अलीकडे असहिष्णुतेच्या मुद्यावरील आमिरच्या वक्तव्यावरून देशात रान उठले होते. आमिरने यावरही खुलासा दिला. मी देशात असहिष्णुता आहे, असे म्हणालो होतो. देश असहिष्णु आहे, असे म्हणालो नव्हतो. देशात असहिष्णुता आहे आणि देश असहिष्णु आहे, असे म्हणण्यात जमीन-अस्मानचा फरक आहे. काही लोक देश तोडण्याची भाषा करतात आणि अशा लोकांना केवळ पंतप्रधानच अटकाव करू शकतात, असेही तो म्हणाला.
 

Web Title: Aamir says, I am still the country's brand ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.