​कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मासोबत काम करण्यास आमिर खानची ‘ना’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 13:08 IST2017-03-30T07:38:16+5:302017-03-30T13:08:16+5:30

बॉलिवूडमधील अनेक चित्रपट कसे हिट होतात? चित्रपट हिट होण्याचा कुठला फार्म्युला आहे का? असे विचारले तर याचे उत्तर होकारार्थीच ...

Aamir Khan's 'No' to work with Katrina Kaif and Anushka Sharma !! | ​कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मासोबत काम करण्यास आमिर खानची ‘ना’!!

​कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मासोबत काम करण्यास आमिर खानची ‘ना’!!

लिवूडमधील अनेक चित्रपट कसे हिट होतात? चित्रपट हिट होण्याचा कुठला फार्म्युला आहे का? असे विचारले तर याचे उत्तर होकारार्थीच द्यावे लागेल. कारण बॉलिवूडमधील अनेक चित्रपट सुपरस्टार्स आणि काही फार्म्युल्यांच्या जोरावरच चालतात. सगळ्यात हिट फार्म्युला आहे, तो हिट जोडीचा. होय,एखाद्या चित्रपटात हिरो-हिरोईनची एखादी जोडी हिट झाली की, त्या जोडीला नव-नव्या चित्रपटात एकत्र आणले जाते. कारण या हिट जोडीला प्रेक्षक मायबापाचे प्रचंड प्रेम मिळाले असते. याच पुण्याईवर नवा चित्रपट चालावा, अशी मेकर्सची अपेक्षा असते. अर्थात हा फार्म्युला सगळ्यांचा मान्य होईल, असेही नाही. आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याचेच घ्या. आमिरची कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मासोबतची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली. आमिरने पुन्हा कॅट व अनुष्कासोबत काम करावे, अशी आपली इच्छा आहे. पण कदाचित आमिर या दोन्ही हिरोईन्ससोबत काम करण्यास इच्छुक नाही.



मीडियातील बातम्या ख-या मानाल तर, आमिरला त्याच्या चित्रपटात हिरोईन रिपीट करणे आवडत नाही. अलीकडच्या काळातील त्याच्या काही चित्रपटांवर नजर टाकल्यास ही, बाब आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. आमिरने त्याच्या चित्रपटात हिरोईन रिपीट केलेली नाही. कॅटरिनासोबत ‘धूम3’ केल्यानंतर अनुष्कासोबत तो ‘पीके’मध्ये दिसला. यानंतर ‘दंगल’साठी त्याने साक्षी तन्वर हिच्या नावाला पसंती दिली. 



ALSO READ : ‘दंगल’मधून आमिर खानने कमविले इतके कोटी!!

सध्या आमिर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहे. खरे तर या चित्रपटासाठी अनुष्का उत्सूक होती, असे कळते. तिने यातील भूमिका पदरात पाडून घेण्यासाठी बरेच प्रयत्नही केले म्हणे. पण आमिर पुन्हा तिच्यासोबत काम करू इच्छित नाही. आता यामागचे कारण तर आम्हाला माहित नाही. हे कारण आमिरच सांगू शकेल!!

Web Title: Aamir Khan's 'No' to work with Katrina Kaif and Anushka Sharma !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.