आमिर खानची मुलगी इरा बॉलिवूडमध्ये करणार एंट्री; ‘या’ दिग्दर्शकासोबत करीत आहे काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 17:07 IST2017-09-10T11:37:54+5:302017-09-10T17:07:54+5:30

मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान याची मुलगी इरा लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. मात्र ती वडिलांप्रमाणे अभिनयात नशीब आजमावणार नसून, ...

Aamir Khan's daughter enters Bollywood; Working with 'this' director is working! | आमिर खानची मुलगी इरा बॉलिवूडमध्ये करणार एंट्री; ‘या’ दिग्दर्शकासोबत करीत आहे काम!

आमिर खानची मुलगी इरा बॉलिवूडमध्ये करणार एंट्री; ‘या’ दिग्दर्शकासोबत करीत आहे काम!

स्टर परफेक्टनिस्ट आमीर खान याची मुलगी इरा लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. मात्र ती वडिलांप्रमाणे अभिनयात नशीब आजमावणार नसून, फिल्म मेकिंगमध्ये करिअर करणार आहे. याकरिता सध्या ती फिल्म मेकिंग शिकत आहे. काही दिवसांपासून चर्चा होती की, इरा खान भारताबाहेर जाऊन फिल्म मेकिंगचे धडे घेऊ इच्छिते. अभिनयात फारसा रस नसल्यानेच फिल्म मेकिंग शिकण्याचा पक्का विचार केल्यानेच इराने विदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता आमच्याकडे इरा संदर्भात एक पक्की बातमी आहे. 

होय, सूत्रानुसार इरा दिग्दर्शक राम माधवानी यांच्या प्रॉडक्शन हाउसला जोडली गेली आहे. या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत चित्रपट, जाहिराती आणि शोज्ची निर्मिती केली जाते. इरा याठिकाणी फिल्म मेकिंगचे बारकावे शिकत आहे. विशेष म्हणजे ती एका प्रोजेक्टचा भागही बनल्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार, इरा राम माधवानी यांच्या ‘बुद्ध’वर आधारित एका प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली आहे. विशेष म्हणजे तिला मेकिंगच्या कोर टीममध्येही संधी देण्यात आली आहे. 



वास्तविक इराने व्यक्त केलेली इच्छा सहज पूर्ण होऊ शकते. कारण इरा आमीर खानसारख्या सुपरस्टार्सची मुलगी आहे. परंतु अशातही ती लो-प्रोफाइल राहून काम करणे पसंत करते. तिला तिच्या टीमबरोबर अतिशय सहजपणे रहायला आणि त्यांच्यात मिसळायला आवडते. मात्र इराला स्टार डॉटर असल्याचे लोकांना दाखविणे पसंत नाही. ती टीममधील अन्य सदस्यांप्रमाणेच मेहनत करण्यावर भर देते. विशेष म्हणजे एखाद्या वेळेस सीनियर ओरडले तरी ती रिअ‍ॅक्ट होत नाही. 

पण काहीही असो, इरामधील कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा पाहता ती नक्कीच बॉलिवूडमध्ये स्वत: सिद्ध करण्यात यशस्वी होईल. शिवाय इराला पप्पा आमीर खान याच्याकडून टीप्स मिळणार आहेतच. 

Web Title: Aamir Khan's daughter enters Bollywood; Working with 'this' director is working!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.