आमिर खानने शेअर केला मुलगी इरासोबतचा फोटो! लोकांनी म्हटले काही तर लाज बाळग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 11:44 IST2018-05-31T06:14:37+5:302018-05-31T11:44:37+5:30

बॉलिवूड स्टार आमिर खान सोशल मीडियावर तर आहे, पण असे असले तरी तो सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव्ह नसतो, हे ...

Aamir Khan shared photo with Era! People have said something shameful !! | आमिर खानने शेअर केला मुलगी इरासोबतचा फोटो! लोकांनी म्हटले काही तर लाज बाळग!!

आमिर खानने शेअर केला मुलगी इरासोबतचा फोटो! लोकांनी म्हटले काही तर लाज बाळग!!

लिवूड स्टार आमिर खान सोशल मीडियावर तर आहे, पण असे असले तरी तो सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव्ह नसतो, हे सत्य आहे. पण अलीकडे आमिरने स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर मुलगी इरा सोबतचा एक फोटो शेअर केला आणि तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. आता या फोटोत असे होते तरी काय?

फोटोत आमिर व इरा दोघेही फन मूडमध्ये दिसताहेत. दोघेही पार्कमध्ये खेळत आहेत. पण सोशल मीडियावरच्या काहींना आमिर व इराचा हा फोटो जराही रूचलेला नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात असा फोटो शेअर करणे गैर असल्याचे त्यांचे मत आहे. अनेक युजर्सने हा फोटो पाहून आमिर व इराबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या आहेत.



‘कुछ तो खौफ खाओ अल्लाह का़ मैं तुम्हारा सन्मान करता हू. लेकीन यह अस्वीकार है,’ असे एका युजरने लिहिले आहे. अनेक युजरने आमिरवर टीका करत रमजानच्या महिन्यात योग्य कपडे घातले पाहिजेत, असा सल्ला दिला आहे. युजर्सचा हा सल्ला विशेषत: इरासाठी आहे. अर्थात यात अनेक आमिर व इराची बाजू घेणारेही युजर्स आहेत.

ALSO READ : ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी आमिर खानने तयार केली खास ‘प्रमोशनल स्ट्रॅटेजी’

सध्या आमिर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात बिझी आहे.  हा चित्रपट १९३९ साली आलेल्या ‘कन्फेशन्स आॅफ ए ठग’ या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. आमिर खान यात मुख्य भूमिकेत आहे. संबंधित कादंबरीत आमिर अली नावाचा एक ठग असतो आणि तो इंग्रजांच्या नाकीनऊ आणतो. तो एक पठाण आहे. इस्माईल नावाचा एक मोठा ठग त्याला जवळ करतो आणि मुलासारखे वाढवतो. आमिर अली त्याचे मित्र बद्रीनाथ आणि पीर खानसोबत ठगबाजी सुरू करतो. यात गणेशा आणि चीता त्याची मदत करतात. नंतर आमिर अली मोठा जमीनदार बनतो, असे याचे कथानक आहे. कादंबरीतील आमिर अलीचे हेच पात्र आमिर साकारतो आहे.या चित्रपटानंतर आमिर खान ‘महाभारत’ या बिग बजेट सिनेमात दिसणार,अशी बातमी सध्या चर्चेत आहे. या प्रोजेक्टसाठी मुकेश अंबानी १ हजार कोटींची गुंतवणूक करणार आणि या चित्रपटात आमिर खान कृष्णाची भूमिका साकारणार, अशीही चर्चा आहे.  

Web Title: Aamir Khan shared photo with Era! People have said something shameful !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.