​‘सीक्रेट सुपरस्टार’मधील भूमिकेसाठी आमिर खानने आधी दिला होता नकार, मग असा झाला राजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 15:47 IST2017-10-15T10:17:22+5:302017-10-15T15:47:22+5:30

आमिर खान व जायरा वसीम या दोघांचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होतो आहे. आमिरचा चार वर्षे ...

Aamir Khan had earlier given up for the role of 'Secret Superstar', then he would have agreed! | ​‘सीक्रेट सुपरस्टार’मधील भूमिकेसाठी आमिर खानने आधी दिला होता नकार, मग असा झाला राजी!

​‘सीक्रेट सुपरस्टार’मधील भूमिकेसाठी आमिर खानने आधी दिला होता नकार, मग असा झाला राजी!

िर खान व जायरा वसीम या दोघांचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होतो आहे. आमिरचा चार वर्षे मॅनेजर राहिलेला अद्वैत चंदन हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. आमिरची काम करण्याची पद्धत ठाऊक असलेला, अगदी आमिरला कोळून प्यालेल्या काही मोजक्या लोकांपैकी अद्वैत हा सुद्धा एक़ त्यामुळेच अद्वैतने आमिरला त्याच्या चित्रपटाचा फर्स्ट कट दाखवला तेव्हा अद्वैत प्रचंड तणावात होता. अद्वैत सांगतो, ते अडीच तास माझ्यासाठी सर्वाधिक तणावाचे अडीच तास होते. पण आमिरने फर्स्ट कट पाहिला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

आमिरबद्दलचा असाच एक किस्सा शेअर करताना अद्वैतने सांगितले की, आमिरचा मॅनेजर असताना दोन वर्षे अगदी दिवसरात्र काम केले. पण दोन वर्षांनंतर एकदिवस मी आमिरकडे गेलो आणि आता मला रविवारची सुट्टी लागेल, असे त्याला म्हणालो. आमिर यावर कसा रिअ‍ॅक्ट होईल मला धाकधूक होती. पण आमिर केवळ राजीचं झाला नाही तर त्याने स्वत:ही रविवारची सुट्टी घेणे सुरु केले. ‘सीक्रेट सुपरस्टार’ पहिल्या आठ दिवसांचे शूटींग आमिरने बघितले तेव्हा मी मनातून अक्षरश: घाबरलो होतो. आमिर   एडिट करणार की काय, हा एकच प्रश्न मला सतावत होता. यादरम्यान मला पॅनिक अटॅकही आला होता. पण अखेर आमिरला फुटेज आवडले आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला. चित्रपटात आमिरचे पात्र फार चांगले नाही. महाखोटारडा, मुलींसोबत फ्लर्ट करणारा, स्वत:चा मोठेपणा सांगून दिखावूपणा करणारे  पात्र आमिरने यात रंगवले आहे. आधी आमिरने या भूमिकेसाठी नकार दिला होता. मी ही भूमिका कशी करू शकतो? ही त्याची पहिली रिअ‍ॅक्शन होती. पण अखेर आमिर मानला. अर्थात यासाठी त्याने आधी स्क्रिन टेस्ट दिली. ‘सीक्रेट सुपरस्टार’साठी पत्नी किरण रावकडे त्याने स्क्रिनटेस्ट दिली. किरण समाधानी झाल्यावरचं तो राजी झाला.

ALSO READ: आईस्क्रीमवाल्याच्या करामती पाहून आमिर खानही झाला अवाक्!!

आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसखाली तयार होणा-या  ‘सीक्रेट सुपरस्टार’ या सिनेमात आमिरने शक्ती कुमार नावाची   भूमिका साकारली आहे. या सिनेमातील आमिरचा लूक त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा असणार आहे.  विचित्र हेअर स्टाईल, अतरंगी दाढी आणि रंगीबेरंगी आणि हटके कपडे या अवतारात शक्ती कुमार म्हणजेच आमिर खान पाहायला मिळणार आहे. अर्थात चित्रपटात त्याचा कॅमिओ आहे. जायरा वसीम यात मुख्य भूमिकेत आहे. गायिका बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया एका मुलीची ही कथा आहे.

Web Title: Aamir Khan had earlier given up for the role of 'Secret Superstar', then he would have agreed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.