‘त्या’ टीकेला दिले आमिर खानने उत्तर; वाचा काय म्हणाला तो...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2016 06:30 PM2016-12-30T18:30:05+5:302016-12-30T18:32:03+5:30

‘दंगल’ची तिकिट खिडकीवर जोरदार घोडदौड सुरू आहे. बॉक्स आॅफिसच्या अनेक विक्रमांना गवसणी घातल्यानंतर आमिर खानचा हा चित्रपट ‘सुल्तान’ला मागे ...

'Aamir Khan' given the criticism; Read what he said ... | ‘त्या’ टीकेला दिले आमिर खानने उत्तर; वाचा काय म्हणाला तो...

‘त्या’ टीकेला दिले आमिर खानने उत्तर; वाचा काय म्हणाला तो...

googlenewsNext
ंगल’ची तिकिट खिडकीवर जोरदार घोडदौड सुरू आहे. बॉक्स आॅफिसच्या अनेक विक्रमांना गवसणी घातल्यानंतर आमिर खानचा हा चित्रपट ‘सुल्तान’ला मागे पाडण्यायसठी आगेकूच करतोय. तत्पूर्वी सिनेमावर कौतुकवर्षाव आणि स्तुतीसुमने जरी उधळली जात असली तरी अनेक बाबातीत टीकादेखील केली जात आहे.

गीता फोगाटला राष्ट्रीय क्रीडा अकादमीमध्ये प्रशिक्षण देणारे कोच पी. आर. सोंधी यांनी चित्रपटात त्यांची भूमिका अतिशय नकारात्मपणे दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘माझे पात्र अत्यंत वाईट पद्धतीने रंगवण्यात आले आहे. माझ्यासोबत इतर चार इतर प्रशिक्षकही त्यावेळी गीतासोबत काम करीत होते. परंतु चित्रपटात केवळ माझेच पात्र दाखवण्यात आले. ‘दंगल’मुळे माझ्या कारर्कीदीला काळिमा फासली गेली आहे.’

सोंधी यांच्या टीकेला उत्तर देताना आमिरने म्हटले की, एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट बनवत असताना त्यामध्ये सिनेमॅटीक कारणांसाठी थोडे फार बदल करावेच लागतात. फक्त बदल करताना मूळ गाभ्याला धक्का पोहचणार नाही एवढी काळजी आम्ही घेतली.

                               Aamir Khan with Coach
                                 अब दंगल होगा : आमिर खान आणि पी. आर. सोंधी

चित्रपटात पी. आर. सोंधी यांच्या भूमिकेचे नाव पी. आर. कदम असे बदलण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा अभिनेता गिरीश कुलकर्णीने ही भूमिका साकारली आहे. शूटींगपूर्वी आमिर सोंधी यांना भेटला होता.

ते म्हणाले की, ‘चित्रपटात माझी भूमिका कशी असेल याची मला मुळीच कल्पना नव्हती. मला माहित आहे की, मनोरंजनासाठी सिनेमाच्या कथेत काही गोष्टी बदलण्यात येतात. परंतु असे करताना माझे चरित्रहनन झाले आहे. चित्रपटात अतिरंजकपणे माझी भूमिका दाखवण्यात आली.’

प्रदर्शनापूर्वी काही उजव्या विचारांच्या संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. भारतात असहिष्णुता वाढत आहे. माझ्या पत्नीने तर देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता, असे आमिर खानने मार्च महिन्यात वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून या संघटनांनी ‘दंगल’ला विरोध केला होता.

Web Title: 'Aamir Khan' given the criticism; Read what he said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.