मी ज्या हिरोईनच्या हातावर थुंकलो, त्या नंबर 1 झाल्यात...! आमिर खानने अनेकींची केली फजिती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:07 PM2020-04-24T13:07:08+5:302020-04-24T13:08:12+5:30

धम्माल गोष्टी...

aamir khan favourite prank was when he spat on heroines like madhuri dixit juhi chawla-ram | मी ज्या हिरोईनच्या हातावर थुंकलो, त्या नंबर 1 झाल्यात...! आमिर खानने अनेकींची केली फजिती!!

मी ज्या हिरोईनच्या हातावर थुंकलो, त्या नंबर 1 झाल्यात...! आमिर खानने अनेकींची केली फजिती!!

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या सहकलाकारांची फजिती करताना त्याला मज्जा यायची.

आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. रूपेरी पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा तुमचा आमचा हाच लाडका आमिर सुरुवातीच्या काळात त्याच्या प्रँक्ससाठीही ओळखला जायचा.  शूटींगच्या सेटवर सहकलाकारांसोबत त्याने केलेले प्रँक्सचे किस्से ऐकाल तर अक्षरश: हसून हसून पोट दुखेल. होय, अगदी हिरोईनच्या हातावर थुंकण्यापासून तर अशा अनेक धम्माल गोष्टी आमिरने केल्या आहेत.

‘इश्क’ या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा. या सेटवर आमिर अनेकदा जुहीची मजा घेत, तिच्यासोबत प्रँक करायचा. आमिरला ही सवयचं होती. आपल्या सहकलाकारांची फजिती करताना त्याला मज्जा यायची. एकदा त्याने मला भविष्य कळते, असे म्हणून जुहीला हात पुढे करायला सांगितले. पण जुहीने जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला. या प्रकारानंतर जुही इतकी खवळली की, तिने आमिरशी बोलणे बंद केले. अर्थात दोघांनीही ‘इश्क’च्या शूटींगवर या वादाचा परिणाम होऊ दिला नाही.


 
‘दिल’ या सिनेमाच्या सेटवर माधुरी दीक्षितसोबतही आमिरने असेच केले होते.  या सिनेमातील ‘खंबे जैसी खडी है’ या गाण्याचं शूटिंग सुरू असताना आमिरने माधुरीला पटवले. मला हात बघता येतो, भविष्य कळत, असे काय काय तिला सांगितले. माधुरी त्याच्या थापांना भुलली. तिने हात समोर करताच आमिर तिच्या हातावरही पचकन थुंकला. ते पाहून माधुरी इतकी खवळली होती की,  हॉकी स्टिक घेऊन त्याला मारायला धावली होती.

आमिरला हे सगळे करण्यात मज्जा यायची. मी ज्या हिरोईनच्या हातावर थुंकलो त्या नंबर 1 झाल्यात असे तो गमतीने सांगायचा.

Web Title: aamir khan favourite prank was when he spat on heroines like madhuri dixit juhi chawla-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.