‘दंगल’मधून आमिर खानने कमविले इतके कोटी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 15:58 IST2017-03-19T10:23:10+5:302017-03-19T15:58:04+5:30
आमिर खानच्या ‘दंगल’ या सिनेमाने बॉक्सआॅफिसवरील कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर सुमारे ५३२ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. ...

‘दंगल’मधून आमिर खानने कमविले इतके कोटी!!
आ िर खानच्या ‘दंगल’ या सिनेमाने बॉक्सआॅफिसवरील कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर सुमारे ५३२ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. पण यात आमिरचा स्वत:चा वाटा किती होता, माहितीयं? तर ऐका. या चित्रपटातून आमिरने कमावले पुरते १७५ कोटी रुपये. होय, आमिरचे दुसºया कलाकारांसारखे नाही. आमिर जो चित्रपट करतो, त्यासाठी मानधन तर घेतोच. शिवाय बॉक्सआॅफिसवरील नफ्यातही तो भागीदार असतो. यात सेटलाइट राइट्सचाही समावेश असतो. ‘दंगल’च्या निर्मात्यांमध्ये आमिरचा सहभाग होता. आमिर आमिर, यूटीव्ही मोशन पिक्चर्स आणि वॉल्ट डिस्ने पिक्चर्स यांनी संयुक्तपणे ‘दंगल’ची निर्मिती केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नफ्यातील ठरलेल्या भागीदारीनुसार आमिरच्या वाट्याला अंदाजे १७५ कोटी रुपये आले आहेत. चित्रपटासाठी त्याने ३५ कोटी मानधन स्वीकारले होते. याशिवाय चित्रपटाच्या नफ्यात त्याचा ३३ टक्के वाटा होता.
‘दंगल’ाने बॉक्स आॅफिसवर नवा विक्रम रचला होता.सलमान खानच्या ‘बरजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा विक्रम मोडित काढत आणि स्वत:च्याच्या ‘पीके’ या चित्रपटाला ही मागे टाकत ‘दंगल’हा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा विक्रम सध्या ‘दंगल’च्या नावावर आहे. आतापर्यंत हा विक्रम आमीरच्या ‘पीके’ चित्रपटाच्या नावावर होता. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या चित्रपटाची एकूण कमाई ३४०.८ कोटी रुपये इतकी आहे. मात्र ‘दंगल’ चित्रपटाने ३४५.३ कोटी रुपयांचा गल्ला जमवत अवघ्या १७ दिवसात हा विक्रम मोडित काढला होता.