‘बॅँक चोर’च्या नव्या ट्रेलरमध्ये आमीर, जॉन, हृतिकची उडविली टर्रर्र...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 22:24 IST2017-05-12T16:54:20+5:302017-05-12T22:24:20+5:30

​अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी ‘बॅँक चोर’ या कॉमेडीपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची टर्रर्र उडविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Aamir, John, Hrithik flew in a new trailer of 'Bangkok Chor' ...! | ‘बॅँक चोर’च्या नव्या ट्रेलरमध्ये आमीर, जॉन, हृतिकची उडविली टर्रर्र...!

‘बॅँक चोर’च्या नव्या ट्रेलरमध्ये आमीर, जॉन, हृतिकची उडविली टर्रर्र...!

िनेता रितेश देशमुख याच्या आगामी ‘बॅँक चोर’ या कॉमेडीपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची टर्रर्र उडविण्यात आल्याचे दिसून येत आहे. आमीर खान, जॉन अब्राहम, हृतिक रोशनसारख्या अभिनेत्यांच्या ट्रेलरमध्ये झलक दिसत असल्यातरी त्या खिल्ली उडविण्याच्या हेतूनेच दाखविण्यात आल्याचे स्पष्ट होते. 

काही दिवसांपूर्वीच रितेशच्या ‘बॅँक चोर’ या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. ट्रेलरमध्ये रितेश एका साधूच्या वेशात असून, तो त्याच्या सहकाºयांबरोबर एक बॅँक लुटण्यासाठी जात असतो. त्याचे दोन मित्र गुलाब आणि गेंदा यांनी हत्ती आणि घोड्याचे मुखवटे घातलेले असून, जणू काही बॅँकमध्येच चित्रपटाची संपूर्ण कारनामा दाखविण्यात आला आहे. 

असो, आता काही वेळापूर्वीच ‘बॅँक चोर’चा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, हा ट्रेलर अतिशय वेगळ्या पद्धतीने बनविण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपटातील वेगवेगळ्या पात्रांसोबत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची खिल्ली उडविली आहे. अशा पद्धतीने चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करून प्रचार करण्याचा हा फंडा प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. 



ट्रेलरमध्ये सांगितले जात आहे की, वाय फिल्म प्रॉडक्शनने स्वत:च सांगून घेतली. भलेही कॉमेडी दाखवून... पण आमीर, जॉन आणि हृतिक रोशन यांना बॅँक चोर असे म्हणत ‘साले’ शब्दाचाही उल्लेख केला. एवढेच नव्हे तर रितेश देशमुखची काय औकात आहे, असे शब्द ट्रेलरमध्ये ऐकावयास मिळतात. कॉमेडियन कपिल शर्माला बेवफा तर विवेक ओबेरॉयला गरिबांचा सिंघम म्हणून संबोधले आहे. 

बºयाच कालावधीनंतर अभिनेता विवेक ओबेरॉय ‘बॅँक चोर’मध्ये पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. विवेक आणि रितेश याअगोदर २०१६ मध्ये आलेल्या ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ या चित्रपटात एकत्र बघावयास मिळाले होते. ‘लिप्स है तेरे लाल, काले तेरे बाल, पहले आया अन्ना बाद मे केजरीवाल’ या डायलॉगसह प्रसिद्ध रॅपर बाबा सहगलही या चित्रपटात कॉमेडीचा तडका लावताना दिसणार आहे. 

दरम्यान ‘बॅँक चोर’ या चित्रपटाची निर्मिती वाय-फिल्म्सने केली आहे. वाय फिल्म्स यश राज फिल्म्सचे यूथ प्रॉडक्शन हाउस आहे. ‘बॅण्ड बाजा बारात, लव शॉट्स आणि लेडिज रूम’ यासारख्या हिट वेबसीरिजची या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या १६ जून रोजी रिलीज होणार असून, तरुण दिग्गदर्शक बंपी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

Web Title: Aamir, John, Hrithik flew in a new trailer of 'Bangkok Chor' ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.