​आमिर-फातिमाची वाढू लागलीयं जवळीक! कॅटरिना कैफला वाटू लागलेयं असुरक्षित!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 14:01 IST2018-03-28T08:31:45+5:302018-03-28T14:01:45+5:30

आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशा दोघी आहेत, हे आपल्याला ठाऊक ...

Aamir-Fatima grew and thirsty! Katrina Kaifa seems to be insecure !! | ​आमिर-फातिमाची वाढू लागलीयं जवळीक! कॅटरिना कैफला वाटू लागलेयं असुरक्षित!!

​आमिर-फातिमाची वाढू लागलीयं जवळीक! कॅटरिना कैफला वाटू लागलेयं असुरक्षित!!

िर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशा दोघी आहेत, हे आपल्याला ठाऊक आहेच. ‘दंगल’नंतर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा फातिमाचा आमिरसोबतचा दुसरा चित्रपट आहे. आता या चित्रपटात फातिमाची वर्णी कशी लागली, हे सगळ्यांनाचं ठाऊक आहे. ‘दंगल’नंतर आमिर फातिमासाठी एक मेंटर बनला आहे. केवळ मेंटर नाही तर आमिर आणि फातिमा यांच्या जवळीकीच्या बातम्याही चवीने चघळल्या जात आहे. इतक्या की, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या स्टारकास्टला कमालीचे असुरक्षित वाटू लागले आहे. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, कॅटरिना कैफबद्दल. 



ताज्या बातमीनुसार, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील आपल्या भूमिकेबद्दल कॅटला असुरक्षित वाटू लागले आहे. तसेही आमिरच्या चित्रपटात हिरोईनला फार वाव नसतोच. त्यातचं या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चनही आहे.    कॅटला हे आधीच ठाऊक होते. पण केवळ यशराज फिल्म्स आणि आदित्य चोप्रासोबतच्या चांगल्या रिलेशनशिपमुळे कॅट  या चित्रपटात काम करण्यासाठी राजी झाली. पण तरीही आपल्याला या चित्रपटात फार वाव नाही, ही भावना कॅटच्या मनातून गेली नाहीच. त्यातच आमिर व फातिमाच्या जवळीकीमुळे कॅटला आणखीच असुरक्षित वाटू लागले आहे. याच असुरक्षिततेपोटी कॅटने म्हणे अलीकडे आदित्य चोप्राची भेट दिली. तू असुरक्षित वाटून घेऊ नकोस, असे आदित्यने सांगितल्यावर कॅटच्या म्हणे जीवात जीव आला.

ALSO READ : WATCH : ​मीडियाच्या शेकडो कॅमे-यांसमोर एकाच कपातून कॉफी पितांना दिसले सलमान खान अन् कॅटरिना कैफ!

‘दंगल’मध्ये फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटानंतर आमिरच्या पुण्याईने फातिमाला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ मिळाला. आमिरनेच यशराज फिल्म्सकडे फातिमाची शिफारस केली होती. मध्यंतरी‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ मध्ये फातिमाला कास्ट केल्यामुळे आमिरची पत्नी किरण राव नाराज असल्याची बातमीही  आली होती. त्याआधी तर फातिमा व आमिरबद्दल वेगळीच चर्चा रंगली होती.  आमिर व फातिमाच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या दबक्या आवाजात सुरु होत्या. दोघेही परस्परांच्या बरेच जवळ आले आहेत आणि हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय, अशी ही चर्चा  होती.  

Web Title: Aamir-Fatima grew and thirsty! Katrina Kaifa seems to be insecure !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.