हे कसलं ट्रिब्युट? अहाना कुमराचे झुलन गोस्वामीच्या गेटअपमधील फोटो पाहून भडकले युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:16 PM2021-03-22T12:16:42+5:302021-03-22T12:17:33+5:30

अहानाने काय केले तर भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रिब्युट दिले. पण अहानाचे हे फोटो पाहून नेटकरी मात्र भडकले.

aahana kumra gets brutally trolled for her dark face makeup in jhulan goswami getup | हे कसलं ट्रिब्युट? अहाना कुमराचे झुलन गोस्वामीच्या गेटअपमधील फोटो पाहून भडकले युजर्स

हे कसलं ट्रिब्युट? अहाना कुमराचे झुलन गोस्वामीच्या गेटअपमधील फोटो पाहून भडकले युजर्स

googlenewsNext
ठळक मुद्देलिपस्टिक अंडर माय बुरखा, द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा झळकली होती.

बॉलिवूड अभिनेत्री अहाना कुमरा बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली हीच अहाना कुमरा  सध्या तिच्या ताज्या पोस्टमुळे चर्चेत आहे. होय, तर अहानाने काय केले तर भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रिब्युट दिले. अहानाने काही फोटो शेअर केलेत. यात ती झुलनच्या गेटअपमध्ये दिसतेय. पण अहानाचे हे फोटो पाहून नेटकरी मात्र भडकले.

फोटोंमध्ये अहानाने मेकअपच्या मदतीने झुलनचा लुक धारण केला आहे. हे फोटो शेअर करताना अहानाने भावूक पोस्ट लिहिली आहे.  ‘नाही, हे कोणत्याही सिनेमाचे प्रमोशन नाही. हा केवळ झुलनबद्दलचा सन्मान आहे. तिच्यासोबत खूप सारा वेळ घालवल्यानंतर, तिची कहाणी ऐकल्यानंतर, तिच्या प्रवासातील अनंत अडचणी आणि खेळाप्रतीचा तिचा ध्यास जाणून घेतल्यानंतरचा हा सन्मान. झुलन गोस्वामीला भारतीय महिला क्रिकेट संघात सगळेजण झुलन दी म्हणून बोलवतात. तिच्याबद्दल संघात मोठा आदर आहे. झुलन तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळाले, त्याबद्दल आभार. तुझ्या भल्यासाठी मी निरंतर प्रार्थना करेन,’ असे अहानाने लिहिले.अर्थात या पोस्टनंतर अहानाला नेटक-यांनी ट्रोल करणे सुरु केले. कारण या फोटोंमध्ये अहानाने तिचा चेहरा डार्क केला आहे. 

‘चेहरा काळा दाखवून तू झुलनचा अपमान केला आहेस,’ असे एका युजरने अहानाला सुनावले. चेहरा काळा करून कसले ट्रिब्युट देतेस? तू 1 टक्काही तिच्यासारखी दिसत नाहीये. त्यामुळे हा झुलनबद्दलचा सन्मान आहे की डायरेक्टरर्ससाठी तुझे निमंत्रण? तिच्यावर सिनेमा बनवा आणि तिच्या भूमिकेसाठी मला घ्या, असे तुला म्हणायचे आहे की तू झुलनची खिल्ली उडवत आहेस? असे एका युजरने यावर लिहिले.

नेटक-यांनी या फोटोंवरून अहानाला ट्रोल केले असले तरी खुद्द झुलनने मात्र अहानाचे कौतुक केले आहे. ‘खूप छान, असेच काम करत राहा,’ असे झुलनने यावर म्हटले आहे.

लिपस्टिक अंडर माय बुरखा, द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा झळकली होती.

Web Title: aahana kumra gets brutally trolled for her dark face makeup in jhulan goswami getup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.