६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘बाहुबली’ची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 17:10 IST2016-03-28T22:58:18+5:302016-03-28T17:10:03+5:30
अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सोमवारी दिल्लीत झाली. यात अनेक भाषांमध्ये साकारलेल्या आणि ...

६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘बाहुबली’ची बाजी
अमिताभ यांचा सलग चौथा सन्मान
अमिताभ बच्चन यांनी चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. ‘पीकू‘ या चित्रपटातील सनकी पित्याच्या भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहिर झाला. यापूर्वी ‘अग्निपथ’, ‘ब्लॅक’ आएि ‘पा’साठी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.
कंगनाला वाढदिवसाची भेट
गत आठवड्यात आपला २९ वा वाढदिवस साजरा करणारी अभिनेत्री कंगना रानोट हिने सलग दुसºयांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. रोमॅन्टिक विनोदी चित्रपट ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’मध्ये अडचणीत सापडलेली एक पत्नी(तनू) आणि हरियाणातील खेळाडू दत्तो अशी दुहेरी भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाºया कंगनाला दुसºयांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
अन्य राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : दम लगा के हैशा
सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट : बजरंगी भाईजान
विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट -हरिष भीमानी(मला लाज वाटते)
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म : अमोल देशमुख (औषध: मराठी)
सर्वोत्कृष्ट नृत्य: रेमो (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री(ज्युरी): कल्की (मार्गारेट विद स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट गीतकार : वरूण ग्रोवर(मोह मोह के धागे...)
सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री : तन्वी आझमी(बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण(दिग्दर्शक): मसान