6328_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 19:55 IST2016-05-22T11:34:09+5:302016-05-22T19:55:54+5:30
लंडनच्या इंडिगो ग्रीनिच इथं मराठमोळा गायक अवधूत गुप्तेचा सूरमयी आवाज घुमला. डॉ. महेश पटवर्धन आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा' या सांस्कृतिक कार्यक्रमात अवधूत गुप्ते आपल्या सूरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 'फॅन' सिनेमातील गाण्याचं मराठी वर्जन सादर करुन अवधूतनं लंडनमधील रसिकांवर मोहिनी घातली.. महेश पटवर्धन यांनी 2007 साली सुरुवात केल्यापासून अवधूत या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. भारताबाहेर अनेक परफॉर्मन्स दिलेल्या अवधूतला गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमात परफॉर्मन्स दिल्यानंतर विशेष आनंद मिळतो. 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात परफॉर्मन्स देणं हा बहुमान असून त्यासाठी अवधूतनं महेश पटवर्धन यांचे आभार मानलेत.

6328_article
ल डनच्या इंडिगो ग्रीनिच इथं मराठमोळा गायक अवधूत गुप्तेचा सूरमयी आवाज घुमला. डॉ. महेश पटवर्धन आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा' या सांस्कृतिक कार्यक्रमात अवधूत गुप्ते आपल्या सूरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 'फॅन' सिनेमातील गाण्याचं मराठी वर्जन सादर करुन अवधूतनं लंडनमधील रसिकांवर मोहिनी घातली.. महेश पटवर्धन यांनी 2007 साली सुरुवात केल्यापासून अवधूत या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. भारताबाहेर अनेक परफॉर्मन्स दिलेल्या अवधूतला गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमात परफॉर्मन्स दिल्यानंतर विशेष आनंद मिळतो. 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात परफॉर्मन्स देणं हा बहुमान असून त्यासाठी अवधूतनं महेश पटवर्धन यांचे आभार मानलेत.
लंडनच्या मराठी नाट्य रसिकांसाठी यंदाचा डॉ. महेश पटवर्धन आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा' हा कार्यक्रम स्मरणीय ठरलाच, तसा या कार्यक्रमात सहभाग नोंदवणाºया कलाकारांसाठीही या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली लंडनवारी आणि यादरम्यान पटवर्धन यांच्या घरचा पाहुणचार संस्मरणीय ठरला. मराठमोळा गायक अवधूत गुप्ते याने याबाबत सांगितले. तो म्हणाला, सर्व कलाकार कार्यक्रमाआधी पटवर्धनांच्या घरी जमले आणि घरच्या जेवणावर मस्तपैकी ताव मारला. अर्थात जेवणासोबत आम्ही सर्वांच्या गप्पाही रंगल्या. चित्रपटांपासून, राजकारण, क्रिकेट आणि तत्त्वज्ञानापर्यंत अशा सर्व विषयांवर आम्ही भन्नाट बोलत सुटलो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'गर्जा महाराष्ट्र माझा'च्या कलाकारांमध्ये एक वेगळा बॉन्ड तयार झालाय. कलाकारांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी एक व्हॉट्स अॅप ग्रूपही तयार केलाय. ‘Patwardhan`s Kitchen’ असे या ग्रूपचे नाव.
![]()
व्यासपीठावर अप्सरा आली.. ती थिरकली आणि तिनं जिंकलं असंच काहीसं वर्णन करावं लागेल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लंडनमधील खास डान्स परफॉर्मन्सचं. निमित्त होतं महेश पटवर्धन आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाचं. सोनालीच्या या खास बहारदार आणि दिलखेचक परफॉर्मन्सनं या कार्यक्रमाला चारचाँद तर लावलेच शिवाय लंडनमधील तमाम मराठी रसिकांना आपल्या तालावर थिरकण्यास भाग पाडलं. पब्लिक डिमांडमुळं पुन्हा एकदा अप्सरा केल्याचं सोनालीनं सांगितलं. महेश पटवर्धन यांच्यासोबत आधी काम केलं असून हॅट्रिक परफॉर्मन्सचा आनंद तिच्या चेह-यावर पाहायला मिळाला.. गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमासाठी येणारे रसिक स्पेशल असतात, त्यामुळं त्यांच्यापुढे परफॉर्मन्स देणं हे तितकंच स्पेशल असतं असं तिला वाटतं. मनोरंजनासह सामाजिक बांधिलकी जपणा-या महेश पटवर्धन यांच्या या 'गर्जा महाराष्ट्र' कार्यक्रमाशी जोडलं जाणं हे खास असतं आणि त्यातून मिळणा-या लोकांच्या आशीवार्दातून नवी ऊर्जा मिळते असं सोनालीनं म्हटलंय.