5532_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 16:11 IST2016-04-27T10:41:32+5:302016-04-27T16:11:32+5:30

मलाला युसुफजाई एकेठिकाणी म्हणाली होती, ‘अशी एक वेळ येते, ज्यावेळी तुम्हाला शांत रहावयाचे की त्याविरुद्ध उभे राहायचे यापैकी एक निवडायचे असते.’ मानवाधिकार चळवळीतील महिलांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणावर आहे. समानता आणि मुळ मानवी अधिकार याबाबत महिला सातत्याने पुढे आल्या आहेत. त्यांनी केलेल्या लढ्यामुळे अगदी कमी प्रमाणात यश आले असेल, परंतु त्यांनी दिलेला लढा हा मोठा आहे. मानवाधिकाराबाबत लढा देणाºया महिलांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5532_article | 5532_article

5532_article

ाला युसुफजाई एकेठिकाणी म्हणाली होती, ‘अशी एक वेळ येते, ज्यावेळी तुम्हाला शांत रहावयाचे की त्याविरुद्ध उभे राहायचे यापैकी एक निवडायचे असते.’ मानवाधिकार चळवळीतील महिलांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणावर आहे. समानता आणि मुळ मानवी अधिकार याबाबत महिला सातत्याने पुढे आल्या आहेत. त्यांनी केलेल्या लढ्यामुळे अगदी कमी प्रमाणात यश आले असेल, परंतु त्यांनी दिलेला लढा हा मोठा आहे. मानवाधिकाराबाबत लढा देणाºया महिलांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
मानवाधिकाराबाबत लढा देणाºया महिलांच्या यादीत सर्वोच्च स्थानावर मलाला असल्याचे कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. १९९७ साली मलालाचा जन्म झाला. सेवा आणि शिक्षण यावर तिच्या कुटुंबाचा विश्वास होता. याबाबत मलालाला आपले वडील झियाउद्दीन युसुफजाई यांच्याकडून सतत प्रेरणा मिळाली. झियाउद्दीन हे शाळेचे संचालक, ज्यांचे मुलींनी शिकले पाहिजे असे ठाम मत होते. २००७ साली तालिबाने या भागात धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली. मलालाने तालिबानचा क्रुर छळ पाहिला होता. मुलींच्या शिक्षणाविरुद्ध तालिबानने फतवा काढला. तरीही झियाउद्दीन यांनी या भागात मुलींना शिकविण्यास प्रारंभ केला. मलालाने तालिबानी छळाविरुद्ध लिहिण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने स्वात भागात तालिबानी फौजेविरुद्ध लढा दिला. युनिसेफच्या चित्रपटात तिने भूमिका केली. याचा राग धरुन तालिबानने ९ आॅक्टोबर २०१२ ला १४ वर्षीय मलालास गोळ्या घातल्या. तिच्यावरील हल्ल्याची बातमी जगभर पसरली. २०१४ चा नोबेल शांतता पुरस्कार तिला मिळाला.

Web Title: 5532_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.