४२ वर्षीय शिल्पा शेट्टीच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, तुम्हीही पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:05 IST2018-01-25T09:35:05+5:302018-01-25T15:05:39+5:30
४२ वर्षीय शिल्पा शेट्टी एका अवॉर्ड नाइटमध्ये पोहोचली होती. याठिकाणी तिचा जलवा बघण्यासारखा होता. याच सोहळ्यातील तिच्या एका डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

४२ वर्षीय शिल्पा शेट्टीच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, तुम्हीही पाहा!
अ िनेत्री शिल्पा शेट्टी हिची गणती इंडस्ट्रीतील मोस्ट फिट अभिनेत्रींमध्ये केली जाते. वयाच्या ४२व्या वर्षीही शिल्पा एखाद्या २० वर्षांच्या अभिनेत्रीप्रमाणे दिसते. वाढत्या वयाचा तिच्यावर कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. उलट ती दिवसेंदिवस तरुण होताना दिसत आहे. याचा अंदाज शिल्पाचे लेटेस्ट फोटो बघून येतोच. गेल्या बुधवारी मुंबईत आयोजित केलेल्या इंडियाज मोस्ट स्टायलिश अवॉडर््स २०१८ च्या रेड कार्पेटवर शिल्पाचे ग्लॅमर बघण्यासारखे होते. ती खूपच सुंदर दिसत होती.
रेड कार्पेटवर शिल्पा रीम एक्राच्या स्टायलिश गाउनमध्ये पोहोचली होती. या गाउनमध्ये तिचे ग्लॅमर खुलून दिसत होते. अवॉर्ड सोहळ्यात शिल्पाची एंट्री होताच तिच्याकडे बघून सगळे थक्क झाले. यावेळी शिल्पाला इंडियाज मोस्ट स्टायलिश या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. याची माहिती स्वत: शिल्पानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिली. विशेष म्हणजे शिल्पाने आपल्या शिमरी आउटफिटमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडीओही शेअर केला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या अवॉर्ड नाइटमध्ये दीपिका पादुकोण, रेखा, सोनम कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, परिणिती चोपडा यांच्यासह महानायक अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, वरुण धवन, शाहिद कपूर यांनी उपस्थिती लावली होती. या सर्व सुपरस्टारमुळे सोहळ्याला चारचॉँद लागले होते.