3829_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 07:20 IST2016-02-28T14:20:26+5:302016-02-28T07:20:26+5:30

अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री सोनम कपूरचा धाकटा भाऊ हर्षवर्धन कपूर लवकरच बी टाउनमध्ये एण्ट्री करणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झीया’ या चित्रपटात तो झळकणार आहे. हर्षवर्धनने लॉस एंजेलिसमधून सिनेमॅटोग्राफी आणि स्क्रीनप्लेचा अभ्यास पूर्ण केला आहे आणि आता तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहेत. हर्षवर्धनसुद्धा वडील अनिल कपूर आणि बहीण सोनमप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव रोशन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याआधीही अनेक भाऊ-बहीण चित्रपटांत आले आहेत; परंतु यातील काही हिट तर काही फ्लॉप झाले आहेत. त्यांच्या बॉलिवूड प्रवासावर एक नजर...

3829_article | 3829_article

3829_article

िल कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री सोनम कपूरचा धाकटा भाऊ हर्षवर्धन कपूर लवकरच बी टाउनमध्ये एण्ट्री करणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झीया’ या चित्रपटात तो झळकणार आहे. हर्षवर्धनने लॉस एंजेलिसमधून सिनेमॅटोग्राफी आणि स्क्रीनप्लेचा अभ्यास पूर्ण केला आहे आणि आता तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहेत. हर्षवर्धनसुद्धा वडील अनिल कपूर आणि बहीण सोनमप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव रोशन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याआधीही अनेक भाऊ-बहीण चित्रपटांत आले आहेत; परंतु यातील काही हिट तर काही फ्लॉप झाले आहेत. त्यांच्या बॉलिवूड प्रवासावर एक नजर...
आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. पुढे सिद्धांत ‘शूट आउट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटात बघावयास मिळाला. चित्रपट बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविण्यात यशस्वी ठरला. मात्र सिद्धांतला करिअर स्थिर करता आले नाही. आजही सिद्धांत बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करीत आहे.

या दोन भावंडांनी मात्र आपली वेगळी ओळख बनविण्यात यश मिळवले. धर्मेंद्रची मुले असल्याचा त्यांना लाभ झाला खरा पण, त्यावाचून काही अडणार नाही याची काळजी या दोघांनीही घेतली. तुलनात्मकदृष्टीने विचार केला सनी देओल बॉबीपेक्षा जास्त यशस्वी राहिला. पण, म्हणून बॉबीच्या यशाला कमी लेखता येणार नाही.
http://www.cnxdigital.com/assets/images/footer-icon.jpg

Web Title: 3829_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.