​13.10.17 : ‘हेट स्टोरी ४’च्या रिलीजची तारीख जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 08:07 PM2016-11-27T20:07:55+5:302016-11-27T20:07:55+5:30

टी सिरीजच्या ‘हेट स्टोरी’ सिरीजचा चौथा चित्रपट ‘हेट स्टोरी ४’ पुढील वर्षी १३ आॅक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक विशाल ...

13.10.17: Announced the release date for 'Hate Story 4' | ​13.10.17 : ‘हेट स्टोरी ४’च्या रिलीजची तारीख जाहीर

​13.10.17 : ‘हेट स्टोरी ४’च्या रिलीजची तारीख जाहीर

googlenewsNext
ong>टी सिरीजच्या ‘हेट स्टोरी’ सिरीजचा चौथा चित्रपट ‘हेट स्टोरी ४’ पुढील वर्षी १३ आॅक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक विशाल पांड्या दिग्दर्शित ‘हेट स्टोरी ४’ हा इरोटिक थ्रिलर असून बॉक्स आॅफिसवर ‘हेट स्टोरी’ सिरीजचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर पैसा वसूल करणारे मानले जातात. चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी ट्विट करून ‘हेट स्टोरी ’च्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. 

टी सिरीजच्या ‘हेट स्टोरी’फ्रेचायसीचा पहिला चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता.  विक्रम भट निर्मित व दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या या चित्रपटात पावली डॅम, गुलशन देवाइया, निखिल द्विवेदी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. सेंसारची कैची चालल्याने ‘हेट स्टोरी’ने मीडियात चांगलीच जागा मिळविली. यानंतर ‘हेट स्टोरी’चा दुसरा भागासाठी टी सिरीजच्या भूषण कुमार यांनी पुढाकार घेतला. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेट स्टोरी २’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी विवेक पांड्या यानी सांभाळली. ‘हेट स्टोरी २’मध्ये सुरवीन चावला, जय भानुशाली व सुशांत सिंग यांनी भूमिका केल्या होत्या. कमी बजेटमध्ये चांगला व बॉक्स आॅफिसवर कमाई करणारा चित्रपट तयार करता येतो हे या चित्रपटातून सिद्ध झाल्याचे मानले जाते. 

Hate Story 4 release date announced :
यानंतर या सिरीजचा तिसरा भाग ‘हेट स्टोरी ३’मध्ये शरमन जोशी, झरीन खान, करण सिंग ग्रोव्हर व डेझी शाह यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर लगेच निर्मात्यांनी ‘हेट स्टोरी ४’ ची घोषणा केली. यात कुणाच्या भूमिका असतील याचा अद्याप खुलासा करण्यात आला नाही. या चित्रपटाला १३ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रदर्शित होणार असून याची माहिती चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी आपल्या ट्विटरहून दिली आहे. 

Hate Story 4 release date announced :

Web Title: 13.10.17: Announced the release date for 'Hate Story 4'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.