दमदार कमाईनंतर '१२वी फेल'ची आणखी एक मोठी कामगिरी, ऑस्करमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:23 AM2023-11-27T11:23:58+5:302023-11-27T11:24:31+5:30

12vi Fail Movie : अभिनेता विक्रांत मेस्सीचा '१२वी फेल' चित्रपट रिलीज होऊन १ महिना उलटला आहे. तरी अद्याप थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो सुरू आहेत.

12th Fail sent to Oscars as India's independent entry, confirms Vikrant Massey | दमदार कमाईनंतर '१२वी फेल'ची आणखी एक मोठी कामगिरी, ऑस्करमध्ये प्रवेश

दमदार कमाईनंतर '१२वी फेल'ची आणखी एक मोठी कामगिरी, ऑस्करमध्ये प्रवेश

विक्रांत मेस्सी(Vikrant Massey)च्या '१२वी फेल'(12vi Fail)च्या यशाने सर्वांना चकीत केले आहे. कमी बजेटच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४५.१३ कोटींचं कलेक्शन केले आणि हा सुपरहिट ठरला. २७ ऑक्टोबरला रिलीज झालेल्या चित्रपटाचे अद्याप थिएटरमध्ये शो सुरू आहेत. विक्रांत या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधु विनोद चोप्राने केले आहे. आता या चित्रपटासंदर्भात एक चांगली बातमी समोर येत आहे. १२वी फेलने ऑस्कर २०२४मध्ये स्वतंत्र प्रवेश केला आहे. या वृत्ताला विक्रांत मेस्सीने दुजोरा दिला आहे.

विक्रांत मेस्सीने आज तकच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने १२ वी फेलसंदर्भात आनंदाची वार्ता शेअर केली. या कार्यक्रमात विक्रांतने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, जेव्हा तो १५ वर्षांचा होता तेव्हापासून सिनेइंडस्ट्रीशी जोडलेला आहे. कॉलेजच्या फीसाठी वडीलांवर ओझं बनायचे नव्हते. त्यामुळे त्याने तेव्हापासून काम करायला सुरुवात केली होती.  

बॉक्स ऑफिस कलेक्शन

विक्रांतने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगितले की, इतकी आशा नव्हती. आम्हाला माहित होते की, आम्ही चांगला चित्रपट बनवत आहोत आणि जो कुणी थिएटरपर्यंत येणार त्याला चित्रपट आवडणार. पण लोकांना चित्रपट इतका आवडला आहे की, काही लोग सिनेमा दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा पाहत आहेत. कुटुंब आणि मित्रांसोबत पाहत आहेत. आम्ही विचार केला नव्हता की, इतका मोठा आकडा असेल. मी नेहमीच असे मानतो की, चांगले लोक आहेत आणि त्याला चांगले चित्रपट दाखवायचा आहेत. चित्रपटातून खूप काही घेऊन जात आहे.

१२वी फेलची कथा
१२वी फेल चित्रपट अनुराग पाठकच्या याच नावावरील पुस्तकावर आधारीत आहे. यात विक्रांतसोबत मेधा शंकर, अनंत वी जोशी, अंशुमान पुष्कर आणि प्रियांशु चटर्जी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका आयपीएस अधिकाऱ्याची कथा रेखाटण्यात आली आहे, जे १२वीत फेल होते. त्यानंतर त्यांनी वेगळीवेगळ्या ठिकाणी काम केले आणि सोबत युपीएससीच्या तयारीला लागले.

Web Title: 12th Fail sent to Oscars as India's independent entry, confirms Vikrant Massey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.