‘१०२ नॉट आऊट’ ट्रेलर रिलीज! पाहा, अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा हटके अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 14:51 IST2018-03-28T09:21:34+5:302018-03-28T14:51:34+5:30

‘१०२ नॉट आऊट’चे पोस्टर आणि यातील अमिताभ व ऋषी यांचे हटके लूक यामुळे आधीच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘१०२ नॉट आऊट’चा ट्रेलर पाहिल्यानंतर ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचणार, इतके नक्की.

'102 Not Out' Trailer Release! Look, Amitabh Bachchan and Rishi Kapoor have a different story! | ‘१०२ नॉट आऊट’ ट्रेलर रिलीज! पाहा, अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा हटके अंदाज!!

‘१०२ नॉट आऊट’ ट्रेलर रिलीज! पाहा, अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा हटके अंदाज!!

िताभ बच्चन आणि ऋषी कपूर स्टारर ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या चित्रपटाचे पोस्टर आणि यातील अमिताभ व ऋषी यांचे हटके लूक यामुळे आधीच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘१०२ नॉट आऊट’चा ट्रेलर पाहिल्यानंतर ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचणार, इतके नक्की. या चित्रपटात ऋषी कपूर ७५ वर्षांच्या अक्का बाबुलाल या वृद्धाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर अमिताभ बच्चन हे अक्का बाबुलालच्या १०२ वर्षांच्या पित्याची. अर्थात या अक्का बाबुलालच्या या पित्याचे नाव ट्रेलरमध्ये उघड करण्यात आलेले नाही.



ट्रेलरमध्ये १०२ वर्षांचे बिग बी आपल्या ७५ वर्षांच्या मुलाला आयुष्य जगायचे शिकवत आहेत. मुलाच्या भूमिकेत ऋषी कपूर उदास आणि कंटाळवाण्या व्यक्तीच्या भूमिकेत आहे. त्याच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी बिग बी आपल्या मुलाला पत्नीस प्रेमपत्र लिहिण्याचा सल्ला देतात. मुलाच्या आयुष्याची गाडी रूळावर आणण्यासाठी बिग बी ऋषी कपूरला वृद्धाश्रमात पाठवण्याचीही योजना करतानांही ट्रेलरमध्ये दिसतात. ट्रेलर बघता, कथा प्रचंड इंटरेस्टिंग आहे. २ मिनिट ५५ सेकंदाचा हा ट्रेलर म्हणूनच खिळवून ठेवतो. यातील बिग बीचे अनेक संवाद भावूक करतात. ‘औलाद नालायक निकले तो भूल जाना चाहिए, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिए...’, हा बिग बींचा एक संवाद आठवणीत राहतो.

ALSO READ : ​‘संडे दर्शन’ अन् अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ खास चाहता...!!

 चित्रपटाची कथा एका गुजराती नाटकावर आधारित आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. या चित्रपटाद्वारे अमिताभ-ऋषी यांची जोडी तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे. ही जोडी अखेरीस ‘अजुबा’ या चित्रपटात एकत्र बघायवास मिळाली होती.   या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना मेकअपसाठी तीन तास लागायचे. पुढे हे मेकअप उतरवण्यासाठी १ तास लागायचा. त्यामुळे या चित्रपटातील वयोवृद्ध पिता-पुत्राची जोडी पाहण्यास चाहते उत्सूक आहेत.

Web Title: '102 Not Out' Trailer Release! Look, Amitabh Bachchan and Rishi Kapoor have a different story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.