102 Not Out Teaser : अमिताभ बच्चन बनणार आपल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठविणारे पहिले वडील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 09:20 AM2018-02-10T09:20:01+5:302018-02-10T14:50:01+5:30

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या आगामी ‘१०२ नॉन आउट’ या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये दोघा बापलेकांची केमिस्ट्री कमालीची दिसत आहे.

102 Not Out Teaser: Amitabh Bachchan becomes the first father to send his son to his old age! | 102 Not Out Teaser : अमिताभ बच्चन बनणार आपल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठविणारे पहिले वडील!

102 Not Out Teaser : अमिताभ बच्चन बनणार आपल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठविणारे पहिले वडील!

googlenewsNext
ानायक अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर बघावयास मिळणार आहे. उमेश शुक्ला यांच्या आगामी ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटात हे दोघे स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. तब्बल २७ वर्षांनंतर अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर बाप-मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात अमिताभ यांचे वय १०२ वर्ष दाखविण्यात येणार असून, त्यांना पृथ्वीवरील सर्वांत वयोवृद्ध वक्तीचा रेकॉर्ड तोडायचा असतो, तर ऋषी कपूर त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त अभिनेते परेश रावल यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले असून, या अगोदर त्यांनी ‘ओह माय गॉड, ‘आॅल इज वेल’, ‘फुल अ‍ॅण्ड फायनल’ यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. मात्र असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. टीजरमध्ये अमिताभ आणि ऋषी खूपच वयोवृद्ध दिसत आहेत. जे आपल्या म्हातारपणावर रडत बसण्यापेक्षा ते एन्जॉय करणे पसंत करतात. त्यामुळे टीजरमध्ये अमिताभ चक्क वाद्य वाजविताना दिसत आहे, तर ऋषी योगा करताना दिसत आहेत. 



एका प्रसंगात दोघीही भररस्त्यात पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. या दोघांना बाप-मुलाच्या भूमिकेत बघून असे वाटत आहे की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही सोसले असावे. त्यामुळेच अखेरच्या जीवनाचा ते आनंद घेताना दिसत आहेत. टीजरमध्ये हे दिसून येत आहे की, चित्रपटाची कथा अशा बाप-मुलावर आधारित आहे, जे खूपच वयोवृद्ध आहेत. एका प्रसंगात अमिताभ असेही म्हणताना दिसत आहेत की, ‘एका मुलाला वृद्धाश्रमात पाठविणारा मी पहिला बाप बनणार’

दरम्यान, अमिताभ-ऋषी यांची जोडी अखेरीस ‘अजुबा’ या चित्रपटात बघायवास मिळाली होती. तब्बल २७ वर्षांनंतर हे दोघे पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अभिनयाबरोबर एक गाणेही गायिले आहे. आता चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे. 

Web Title: 102 Not Out Teaser: Amitabh Bachchan becomes the first father to send his son to his old age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.