१00 कोटी लोकांनी पाहिले 'कोलावरी डी'व्हाय धिस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:10 IST2016-01-16T01:11:45+5:302016-02-06T06:10:41+5:30

व्हाय धिस कोलावरी डी या गाण्याने काही दिवसांपूर्वी श्रोत्यांना वेड लावले होते. या गाण्याची अख्ख्या भारतामध्ये धूम होती. अनेक ...

100 million people saw 'Kolavari D'Vayya Dhas ... | १00 कोटी लोकांनी पाहिले 'कोलावरी डी'व्हाय धिस...

१00 कोटी लोकांनी पाहिले 'कोलावरी डी'व्हाय धिस...

हाय धिस कोलावरी डी या गाण्याने काही दिवसांपूर्वी श्रोत्यांना वेड लावले होते. या गाण्याची अख्ख्या भारतामध्ये धूम होती. अनेक नवे रेकॉर्ड त्यावेळी गाण्याने रचले. यात आणखी एक भर पडली आहे. यू ट्यूबवर हे गाणे १00 कोटी लोकांनी पाहिले आहे. कोलावरी डी हे गाणे दाक्षिणात्य सिनेअभिनेता ंआणि रजनीकांतचा जावई धनुषने गायले आहे. याला अनिरुद्ध रवीचंदर यांनी संगीतबद्ध केले आहे. रजनीकांत यांची कन्या ऐश्‍वर्या हिच्या पहिल्या चित्रपटात हे गीत आहे. हे गीत इतक्या लोकांच्या ओठावर होते की प्रत्येक ठिकाणी याच गाण्याची फमाईश होत होती. आता १00 कोटींचा पल्ला गाठून कोलावरी डी ने विक्रम केला आहे. असा विक्रम करणारे कोलावरी डी हे पहिलेच भारतीय गाणे ठरले आहे. १६ नोव्हेंबर २0११ साली सोनी म्युझिकवर हे गाणे पहिल्यांदा वाजले. काही दिवसातच हे गाणं सर्वत्र व्हायरल झाले. सोशल नेटवर्किंगवर या गाण्याने धम्माल केली. यू ट्यूबवर हे गाणे सर्वाधिक वेळा पाहिले गेले. या गाण्यामुळे धनुषला घरोघरी ओळखले जाऊ लागले. चार वर्ष झालीत हे गाणे अजूनही लोकांच्या ओठावर आहे.

Web Title: 100 million people saw 'Kolavari D'Vayya Dhas ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.