बॉलीवूड सेलीब्रिटी रेस्टॉरंट मालक

By Admin | Updated: September 24, 2015 00:37 IST2015-09-24T00:37:01+5:302015-09-24T00:37:01+5:30

बॉलीवूड स्टार हे केवळ अभिनयातच व्यस्त असतात असे नाही. अभिनयासह त्यांचे इतरही छंद आहेत. कुणाला विविध खेळ आवडतात, कुणी हॉर्स रायडिंगचा चाहता आहे.

Bollywood celebrity restaurant owner | बॉलीवूड सेलीब्रिटी रेस्टॉरंट मालक

बॉलीवूड सेलीब्रिटी रेस्टॉरंट मालक

बॉलीवूड स्टार हे केवळ अभिनयातच व्यस्त असतात असे नाही. अभिनयासह त्यांचे इतरही छंद आहेत. कुणाला विविध खेळ आवडतात, कुणी हॉर्स रायडिंगचा चाहता आहे. अशाच प्रकारे रेस्टॉरंटच्या प्रेमात पडून त्या व्यवसायाकडे वळणाऱ्या कलाकारांचीही काही कमतरता नाही. नुकतेच आशा भोसले यांनी आपल्या नव्या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले. त्या एकमेव कलाकार नाहीत, त्यासारखे अनेक स्टार्स मंडळींनी आपल्या रेस्टॉरंटमध्ये भारतीय चवीसोबतच देश-विदेशातील विविध पाकशैलीचे दर्शन घडविले आहे. अशाच काही स्टार्स आणि त्यांच्या रेस्टॉरंटची ही झलक.....

अर्जुन रामपाल - ‘लॅप’ : आपल्या अभियनाद्वारे वेगळी छाप पाडणाऱ्या अर्जून रामपाल हा ‘लॅप’ या नवी दिल्लीतील अतिशय प्रशस्त आणि अलिशान रेस्टॉरंटच्या माध्यमातून रेस्टॉरंट व्यवसायात उतरला. चाणक्यपुरीतील हॉटेल सम्राटचाच हा एक भाग आहे. दिसायला भव्यदिव्य आणि चित्तथरारक फिल होणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये मोठे स्टार आवर्जून भेट देत असतात.

बॉबी देओल - समप्लेस एल्स :
बॉबी देओलचे अंधेरीमध्ये स्थित असलेले समप्लेस एल्स हे रेस्टॉरंट म्हणजे भारतीय आणि चायनीज खाद्य पदार्थाचे भंडारच आहे. बॉबी आणखी एका ‘सुहाना’ या रेस्टॉरंटचा मालकदेखील आहे. भारतीय पाकशैलीचे हे अद्वितीय ठिकाण मानले जाते.

शिल्पा शेट्टी - ‘रॉयल्टी’ : क्लब क्लचरच्या ऐश्वर्याचा सार म्हणजे शिल्पा शेट्टीचे ‘रॉयल्टी’ रेस्टॉरंट म्हणावे लागेल. लक्झरीयस लाईफस्टाईलचे हे बांद्रामधील अलिशान रेस्टॉरंट भव्यतेचे दर्शन घडविते. काहीसे क्लासी फील असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये पब आणि इतरही सुविधा आहे. राजसी ठाटाचा अनुभव येथे मिळविता येतो.

नागार्जुन - एन-ग्रील : आपल्या कसदार अभिनयाने सुपरस्टार झालेल्या नागार्जुनचा मुख्य व्यवसाय रेस्टॉरंटचाच आहे. हैद्राबाद येथील एन-ग्रील रेस्टॉरंटमध्ये इटालियन खाद्यपदार्थांची चव चाखता येऊ शकते. येथील भव्यदिव्यतेचे वातावरण पाहून ग्राहकांना ते प्रोत्साहित करते.

सुश्मिता सेन - बंगाली मॅशीस किचन : बंगाली पाकशैलीच्या चाहत्यांचे आवडते ठिकाण म्हणजे सुश्मिता सेनचे बंगाली मॅशीस किचन रेस्टॉरंट होय. येथे गेल्यानंतर खरोखर ‘रिअल फ्लेवर आॅफ बैंगाली’चे दर्शन होते. माफक दरात येथे हे पदार्थ उपलब्ध करुन देण्यात आले असून बंगाली चव येथे चाखता येऊ शकते. मुंबईतील बंगाली खाद्यपदार्थांचे शौकीन आवर्जून येथे हजेरी लावतात.

सुनील शेट्टी - मिसचिफ
डायनिंग बार अ‍ॅण्ड क्लब एच-२०
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीपासूनच सुनील शेट्टीचा रेस्टॉरंट हाच मूळ व्यवसाय आहे. वॉटरस्पोर्ट आणि चवीष्ट खाद्य असे कॉम्बिनेशन सुनील शेट्टीच्या ‘मिसचिफ डायनिंग बार अ‍ॅण्ड क्लब एच-२०’ या रेस्टॉरंटमध्ये अनुभवता येते. येथील खाद्यपदार्थ सर्वांना चकीत करणारे असून तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. येथील स्विमिंगचा एक वेगळाच अनुभव आहे.

आशा भोसले - ‘आशाज’
आपल्या मेलडीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले देखील या यादीत आहे. त्या केवळ गायिकाच नसून त्यांनी अनिवासी भारतीयांना भारतीय व्यंजनांची चव देखील उपलब्ध करुन दिली आहे. आशा भोसले या पहिल्या अशा सेलिब्रेटी आहे, ज्यांनी भारत आणि इतर सहा देशांमध्ये असे भारतीय खाद्य पदार्थांचे रेस्टॉरंट सुरुकेले आहे. ज्यामध्ये इंग्लंड आणि मध्य पूर्व देशांचा समावेश आहे. भारतीय मसाल्यांचा सुगंध दरवळणाऱ्या खाद्यपदार्थांची शृंखलाच येथे उपलब्ध आहे.
- ५्र्नं८‘४ें१.२ं्र३६ं’@’ङ्म‘ें३.ूङ्मे

Web Title: Bollywood celebrity restaurant owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.