"बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत शरीरसंबंध...", बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:34 IST2025-07-11T16:33:13+5:302025-07-11T16:34:57+5:30

एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या रिलेशनशिपबाबत धक्कादायक खुलासा केला होता. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवल्याचं अभिनेत्रीने सांगितलं होतं.

bollywood actress kalki kochien said that had slept with another boy to break up with bf | "बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत शरीरसंबंध...", बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

"बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत शरीरसंबंध...", बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड सेलिब्रिटींचं पर्सनल लाइफ हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमी वेळा उघडपणे भाष्य करतात. एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या रिलेशनशिपबाबत धक्कादायक खुलासा केला होता. बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवल्याचं अभिनेत्रीने सांगितलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडमधील लोकप्रिय कल्की कोचिन. 

कल्कि कोचिन तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबद्दल बोलताना रिलेशनशिपबद्दल उघडपणे भाष्य केलं होतं. यासोबतच तिने ब्रेकअपनंतर एक्ससोबत फ्रेंडशिप न ठेवण्याचाही सल्ला दिला होता. "ब्रेकअपनंतर किमान ६ महिने तरी एक्स बॉयफ्रेंडसोबत फ्रेंडशिप ठेवू नये. मी ब्रेकअपनंतर २ आठवड्यातच नवीन मुलाला डेट करायचे. तुम्ही तुमच्या एक्सला सोशल मीडियावर ब्लॉकही करू शकता. एकदा निर्णय घेतल्यानंतर परत मागे वळून पाहू नका", असं कल्कि म्हणाली होती. 

तरुणपणी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक खुलासाही कल्किने केला होता. "मी दुसऱ्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवायचे आणि माझ्या बॉयफ्रेंडला सांगायचे. जेणेकरुन तो माझ्यासोबत ब्रेकअप करेल", असं कल्किने सांगितलं होतं. दरम्यान, कल्किने 'ये जवानी है दिवानी', 'देव डी', 'लगा चुनरी में दाग' अशा सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 

Web Title: bollywood actress kalki kochien said that had slept with another boy to break up with bf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.