‘बायोग्राफीज्’ जीवनपट अन् काँट्रोव्हर्सीज्
By Admin | Updated: January 16, 2017 02:47 IST2017-01-16T02:47:02+5:302017-01-16T02:47:02+5:30
यश जर त्यांच्याच शब्दांत वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम बायोग्राफीच्या (आत्मचरित्र) माध्यमातून होत असते

‘बायोग्राफीज्’ जीवनपट अन् काँट्रोव्हर्सीज्
-वीरेंद्रकुमार जोगी
बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलावंतांचा संघर्ष, त्यांचे चित्रपट, त्यांनी मिळविलेले यश जर त्यांच्याच शब्दांत वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम बायोग्राफीच्या (आत्मचरित्र) माध्यमातून होत असते. अनेक स्टार्सचा संघर्ष व त्यांच्याबद्दलची माहिती अशा पुस्तकातून मिळते. त्यामुळे बायोग्राफीची चर्चा केली जाते. अनेकदा बायोग्राफीच्या माध्यमातून अनेक वाद चव्हाट्यावर येतात म्हणूनही त्याला प्रसिद्धी मिळते. आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलावंतांच्या जीवनावर आधारित बायोग्राफी बेस्ट सेलर ठरलेल्या आहेत. येत्या काळातही लवकरच बॉलिवूड कलावंतांच्या बायोग्राफीज् वाचकांपर्यंंत पोहोचतील.
दिग्दर्शक करण जोहर हा बॉलि-वूडमधील दिग्गजांपैकी एक मानला जातो. त्याने तयार केलेले चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत. करण हा सातत्याने बॉलिवूडच्या चर्चेत असेलला एकमेव स्टार दिग्दर्शक आहे. त्याच्या जीवनावर आधारित ‘करण जोहर : अॅन अनसुटेबल बॉय’ हे आत्मचरित्र जानेवारी महिन्यात प्रकाशित केले जाणार आहे. करण जोहर याच्यासोबत हे पुस्तक पूनम सक्सेना यांनी लिहिले आहे. या पुस्तकावरून सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी इमेज तयार करणारे ऋषी कपूर यांचे आत्मचरित्र या वर्षी १५ जानेवारी रोजी प्रकाशित होणार आहे. ऋषी कपूर यांच्या बायोग्राफीचे नाव ‘खुल्लम खुल्ला’ आहे. ऋषी कपूर व मीना अय्यर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या बायोग्राफीबद्दलची माहिती ट्विटरवर दिली आहे. ते लिहितात, ‘माझ्या आॅटोबायोग्राफीचे नाव आहे ‘ऋषी कपूर अनसेन्सर्ड : खुल्लम खुल्ला’ १५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. माझ्या मनाच्या अगदी जवळ असणारी. माझे जीवन आणि काळ जो मी जगलो आहे.’
बॉलिवूडमधील मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी करिना कपूर हिचे २०१३मध्ये ‘करिना कपूर : द स्टाईल डायरी आॅफ अ बॉलिवूड दिवा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. करिनाने याच वेळी ‘माझे दुसरे पुस्तक बायोग्रॉफी असेल,’ असे सांगितले होते. या नव्या पुस्तकाचे नाव असेल ‘करिना कपूर : द ब्रॅण्ड बेबो.’ यात तिच्या बॉलिवूड करिअरपासून ते आई होण्यापर्यंतचा प्रवास असेल, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, करिनाला बॉलिवूडमध्ये ‘प्रेग्नन्सी ट्रेन्ड’ आणण्याचे श्रेय दिले जाते. तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या मागील वर्षात सर्वाधिक चर्चेचा विषय होता.
पत्रकार रितुपर्णा चटर्जी या बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याच्या जीवनावर पुस्तक लिहीत आहेत. विशेष म्हणजे, या पुस्तकातून त्याच्या जन्मापासून बॉलिवूडमधील प्रवासावर प्रकाश टाकण्यात येईल. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दिकी याने स्वत: या पुस्तकाची माहिती दिली होती. हे पुस्तक जानेवारी २०१७मध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्याने या वेळी सांगितले होते. नवाजुद्दीन सिद्दिकीवर आधारित पुस्तकासाठी अनुराग कश्यप व स्वत: नवाजुुद्दीन हे रितुपर्णाला माहिती देत असल्याचे सांगण्यात येते. ‘वॉचमेन ते बॉलिवूड स्टार’ असा त्याचा प्रवास या पुस्तकातून चाहत्यांना वाचायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेखा हिच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. मात्र, सध्या या पुस्तकाची चर्चा सुरू झाली आहे. यासीर उस्मान यांनी लिहिलेले ‘रेखा : अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तकात ‘रेखा आपल्या भांगात सिंदूर का लावते?’ या विषयाला धरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रेखाचे नाव अमिताभ बच्चन यांच्याशी जोडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न केला जात आहे. दिल्लीच्या मुकेश अग्रवालनामक व्यावसायिकाशी रेखाचे लग्न झाले होते. मात्र, त्याने काही दिवसांतच आत्महत्या केली होती. रेखाची बायोग्राफी आजही चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.