Bigg Boss11: हिना खान आठवड्याला घेते एवढे लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 16:13 IST2017-10-17T10:43:29+5:302017-10-17T16:13:29+5:30

Bigg Boss11: Lakh Hina Khan gets on weekdays | Bigg Boss11: हिना खान आठवड्याला घेते एवढे लाख

Bigg Boss11: हिना खान आठवड्याला घेते एवढे लाख

'
;ये रिश्ता क्या कहलाता है' म्हणत 'खतरों के खिलाडी' बोल्ड आणि बिनधास्त बनलेली ही अक्षरा म्हणजेच हिना खान आता 'बिग बॉस 11'मध्ये स्पर्धक म्हणून झळकत आहे.बिग बॉस म्हटलं की घरात होणारे वादविवाद, अचानक फुलणारे प्रेमअंकुर असे अनेक गोष्टींमुळे हा शो रसिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतो.'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत  अक्षरा म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खानची प्रचंड लोकप्रियता आहे.हिच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी तिला बिग बॉसकडून ऑफर मिळाली. तसेच हिना खानला डेली सोपप्रमाणे रिअॅलिटी शोमध्येही तिचे वेगळेपण सिध्द करायचे आहे.त्यामुळे खतरों के खिलाडी 8 पर्व आणि आता बिग बॉस 11मध्ये तिने एंट्री घेतली.मात्र हिना खानला बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तगडी रक्कम मिळाल्याचे बोलले जात आहे.हिनाला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये मिळत असल्याच्या चर्चा आहे.तर हितेन तेजवानीला 7 ते 7.5 लाख रुपये मिळतात. 

Also Read:छोट्या पडद्यावर 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने रचला नवा इतिहास,वाचा सविस्तर

हिना खान मालिकेत संस्कारी बहू अक्षराच्या भूमिकेत झळकत होती. कामात काहीतरी नाविन्य असावे त्यामुळे हिनाने ही मालिका सोडली आणि रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडीच्या 8' पर्वात झळकली.या शोमध्ये हिनाचा पूर्वी कधीही न पाहिलेला बोल्ड आणि बिनधास्त रूप पाहायला मिळाले. या शोमध्ये रोहित शेट्टीने दिलेले सगळेच खतरनाक स्टंट तिने यशस्वीरित्या पूर्ण केले.  यंदा बिग बॉसच्या घरातील मंडळी दोन घरात विभागली होती. यंदा बिग बॉसच्या घरातील मंडळी दोन घरात विभागली जाणार असून ते एकमेकांचे शेजारी-शेजारी पाहायला मिळत आहे.तसेच हिनाला अभिनयाव्यतिरिक्त गाण्याचीही आवड.जशी संधी मिळते तेव्हा हिना गाणं गाण्याची संधी मात्र सोडतत नाही.खतरों के खिलाडी 8मध्ये शोचा होस्ट रोहित शेट्टीच्या सांगण्यानुसार ती लग जा गले हे गाणं गात टास्क करताना पाहायला मिळायची. आता असेच काहीसे बिग बॉसच्या घरातही पाहायला मिळाले स्पर्धकांनीही हिनाला गाण्याची फरमाईश करताच तिने चक्क गानकोकिळा लता मंगेशकरांच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अभिनयाप्रमाणेच तिचे संगीतविषयी असलेले प्रेमही लपून राहिलेले नाहीय.

Web Title: Bigg Boss11: Lakh Hina Khan gets on weekdays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.